शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
2
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
3
पालघर-डहाणूत ठाकरे गटाला खिंडार; सरपंच-उपसरपंच-पदाधिकारी शिवसेनेत, एकनाथ शिंदे म्हणाले...
4
Nuwan Thushara Unplayable Delivery : 'बेबी मलिंगा'ची कमाल! लेगला चेंडू टाकत उडवली ऑफ स्टंप (VIDEO)
5
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
6
स्कॉर्पिओ, सेल्टोस अन् हॅरियरचीही ‘बोलती बंद’; लोकांनी या ढासू SUV वर लाखो रुपये केले खर्च! 
7
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
8
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
9
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...
10
मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच इकडचे तिकडे केले...
11
तज्ज्ञांचा इशारा...! ‘या’ बँकेचा स्टॉक 17 रुपयांपर्यंत कोसळणार, गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढले; SBI सह अनेक दिग्गजांनी शेअर विकले
12
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
13
शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढा ! सातबारा कोरा करण्यासाठी कर्जमुक्ती करा
14
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
15
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
16
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
17
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
18
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
19
यंदाच्या गणेशोत्सवात तब्बल ६ लाख कोकणवासीयांचा STने सुखरुप प्रवास; २३ कोटींचे उत्पन्न
20
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”

नाईकांच्या पक्षांतरामुळे जागावाटपाचा प्रश्न; राजकीय समीकरणे बदलणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2019 23:57 IST

शिवसेनेमध्येही अस्वस्थता; दोन्ही मतदारसंघ भाजपला सोडण्यास तीव्र विरोध

नवी मुंबई : ठाणे जिल्ह्याचे माजी पालकमंत्री गणेश नाईक समर्थकांसह बुधवारी भारतीय जनता पक्षात प्रवेश करत आहेत. त्यांच्या प्रवेशामुळे नवी मुंबईमधील राजकीय समीकरणे बदलणार आहेत. जागावाटपावरून युतीमध्येही तणाव निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बेलापूर मतदारसंघामध्ये उमेदवारीचा गुंता वाढणार आहे. शिवसेनेने आक्रमक भूमिका घेऊन दोन्ही मतदारसंघ भाजपला सोडण्यास तीव्र विरोध दर्शविला असून शहरात नाईक विरुद्ध अन्य असा संघर्ष निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

नवी मुंबईचे राजकारण अडीच दशकांपासून गणेश नाईकांच्या भोवती फिरत आले आहे. श्रमिक सेना ही कामगार संघटना, शिवसेनेचे नेते व मंत्री, शिवसेनेमध्ये बंडखोरी करून शिवशक्ती राजकीय संघटनेची स्थापना व नंतर राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करून दहा वर्षे ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्रिपद भूषविले.

नवी मुंबई म्हणजे नाईक असे समीकरण झालेले असताना सहा वर्षांपासून त्यांच्या लोकप्रियतेला ओहोटी लागली. २०१४ मध्ये ठाणे लोकसभा मतदारसंघातून त्यांचे पुत्र संजीव नाईक यांचा मोठ्या फरकाने पराभव झाला व नंतर विधानसभा निवडणुकीमध्ये बेलापूर मतदारसंघातून मंदा म्हात्रे यांनी गणेश नाईक यांचा पराभव केला. त्यानंतर झालेल्या महापालिका निवडणुकीमध्ये त्यांचे अनेक ज्येष्ठ सहकारी सोडून शिवसेना व भाजपत गेले. महापालिका निवडणुकीमध्ये स्पष्ट बहुमत मिळविता आले नाही. काँगे्रसच्या मदतीने सत्ता टिकवावी लागली. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये नवी मुंबईमधून शिवसेनेला तब्बल ८४ हजार मतांची आघाडी मिळाल्यानंतर नाईकांच्या गोटात अस्वस्थता निर्माण झाली.

कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेण्यात आला. जुलैअखेर ऐरोलीचे आमदार संदीप नाईक व माजी महापौरांसह पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. परंतु गणेश नाईक भाजपमध्ये प्रवेश करणार की नाही याविषयी संभ्रम निर्माण झाला होता. बेलापूर मतदारसंघातील उमेदवारी हाच प्रवेशामधील प्रमुख अडथळा समजला जात होता.

बेलापूर मतदारसंघामध्ये भाजपच्या मंदा म्हात्रे आमदार आहेत. उमेदवारीसाठी त्याच प्रबळ दावेदार आहेत. याशिवाय शिवसेनेचे उपनेते विजय नाहटा यांनीही या मतदारसंघामध्ये मोर्चेबांधणी केली आहे. यामुळे नाईकांचा पक्षप्रवेश होण्याविषयी शंका उपस्थित होत होती. अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये ११ सप्टेंबरला वाशीमध्ये शक्तिप्रदर्शन करून भाजपत प्रवेश करण्याचे निश्चित झाले आहे. जवळपास ५५ नगरसेवकांसह गणेश नाईक व संजीव नाईक भाजपत जाणार असल्यामुळे नवी मुंबईच्या राजकारणातील समीकरणेच बदलणार आहेत.शिवसेना झाली आक्रमकगणेश नाईक यांचा भाजप प्रवेश पक्का झाल्यापासून शिवसेना आक्रमक झाली आहे. महापालिकेमध्ये शिवसेनेचे ३८ नगरसेवक आहेत. ऐरोली व बेलापूर मतदार संघामध्ये शिवसेनेची संघटनात्मक ताकदही चांगली आहे. यामुळे नवी मुंबईमधील दोन्ही जागा नाईक परिवाराला सोडण्यास तीव्र विरोध दर्शविला आहे. दोन्ही मतदार संघ दिल्यास विधानसभेला विरोधात काम करण्याचा इशारा दिला आहे. १६ सप्टेंबरला शिवसेना नेते आदित्य ठाकरे जनआशीर्वाद यात्रेनिमित्त नवी मुंबईत येत असून त्यावेळीही बेलापूर मतदार संघासाठी शिवसेना पदाधिकारी हट्ट धरणार आहेत.मंदा म्हात्रे यांची उमेदवारी टिकणार का?बेलापूर मतदारसंघामध्ये २०१४ च्या निवडणुकीमध्ये मंदा म्हात्रे यांनी गणेश नाईक यांचा पराभव केला व पहिल्यांदा नवी मुंबईमध्ये भाजपला यश मिळवून दिले. पाच वर्षांमध्ये नवी मुंबईमधील मोडकळीस आलेल्या इमारती, प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न, एपीएमसीमधील विविध घटकांच्या प्रश्नांवर पाठपुरावा करून मंदा म्हात्रे या नेहमीच चर्चेत राहिल्या. राज्यातील भाजपच्या एकमेव आगरी समाजाच्या महिला आमदार म्हणूनही त्यांची ओळख आहे. ओबीसी चेहरा म्हणूनही त्यांच्याकडे पाहिले जात आहे. यामुळे त्यांची बेलापूर मतदारसंघामधील उमेदवारी पक्की समजली जाते. पण गणेश नाईकांच्या प्रवेशानंतर उमेदवारी टिकणार की नाही याविषयी तर्कवितर्क लढविले जात आहेत.नगरसेवकांचा दबावगट म्हणून वापरराष्ट्रवादी काँग्रेसचे ५० व ५ अपक्ष नगरसेवक घेऊन गणेश नाईक भाजपत प्रवेश करत आहेत. ९ सप्टेंबरला नगरसेवक कोकण आयुक्तांकडे वेगळा गट करण्याचे निवेदन देणार होते. पण कागदपत्रांची पूर्तता झाली नसल्याचे कारण देऊन बुधवारी सकाळी वेगळा गट करण्याचे निश्चित झाले आहे. बेलापूर मतदारसंघातील उमेदवारीसाठी नगरसेवकांचा दबावगट म्हणून वापर केल्याचे बोलले जाऊ लागले आहे. पक्षप्रवेशामुळे बेलापूर मतदारसंघावरून शिवसेना व भाजपमध्येही संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे.युतीमध्ये उमेदवारीवरून तणावलोकसभा निवडणुकीमध्ये बेलापूर मतदार संघातून शिवसेना उमेदवाराला ३९ हजार मतांची आघाडी व ऐरोलीमधून ४४ हजार मतांची आघाडी मिळाली होती. यामुळे युतीमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. एक जागा शिवसेना व एक भाजपला मिळणार हे निश्चित झाले होते. परंतु संदीप नाईकांच्या भाजप प्रवेशामुळे ऐरोली मतदारसंघ भाजपकडे जाणार हे स्पष्ट झाले. यानंतर गणेश नाईकांच्या प्रवेशामुळे बेलापूर मतदारसंघातून त्यांना उमदेवारी दिली जाण्याची चर्चा झाल्यामुळे युतीमध्ये तणाव निर्माण झाला आहे.

टॅग्स :Ganesh Naikगणेश नाईकBJPभाजपाShiv SenaशिवसेनाManda Mhatreमंदा म्हात्रे