बेलापूरातील पादचारी पुलाचा प्रश्न मार्गी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2016 02:20 IST2016-04-23T02:20:03+5:302016-04-23T02:20:03+5:30

आयकर कॉलनी व बेलापूर गाव दरम्यान रेल्वे क्रॉसिंगवर पादचारी पूल बांधण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. ४ कोटी रुपये खर्चाच्या प्रस्तावास प्रशासकीय मान्यता देण्यात आली

The question of Belalpur pedestrian bridge will be resolved | बेलापूरातील पादचारी पुलाचा प्रश्न मार्गी

बेलापूरातील पादचारी पुलाचा प्रश्न मार्गी

नवी मुंबई : आयकर कॉलनी व बेलापूर गाव दरम्यान रेल्वे क्रॉसिंगवर पादचारी पूल बांधण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. ४ कोटी रुपये खर्चाच्या प्रस्तावास प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून यामुळे रेल्वे रूळ ओलांडताना होणारे अपघात थांबणार आहेत.
पारसिक हिलच्या पायथ्याशी सिडकोने आयकर कॉलनी वसविली आहे. परंतु येथील नागरिकांना जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी बेलापूर व सीबीडी परिसरात जावे लागते. शाळेत जाण्यासाठीही रेल्वे रूळ ओलांडावा लागतो. यामुळे वारंवार अपघात होतअसून अनेक रहिवाशांना जीव गमवावा लागला आहे. याठिकाणी होणारे अपघात थांबविण्यासाठी भुयारी किंवा पादचारी मार्ग तयार करण्याची मागणी नागरिकांनी केली होती. नगरसेवक अमित पाटील, माजी विरोधी पक्षनेत्या व विद्यमान नगरसेविका सरोज पाटील यांनी वारंवार पाठपुरावा केला होता. दोन बाजूला टेकडी व उर्वरित बाजूला रेल्वे रूळ असल्यामुळे रहिवाशांना तुरुंगात डांबल्यासारखे झाले होते. ही गैरसोय दूर करण्यासाठी पालिकेने येथे पादचारी पूल बांधण्याचा निर्णय घेतला आहे. हे काम रेल्वेच्या वतीने केले जाणार आहे. सर्व डिझाईन व जनरल जे आऊट रेल्वेच्यावतीनेच तयार केला जाणार आहे. येथे ८२ मीटर लांब ४ मीटर रुंद पूल उभारला जाणार आहे. यासाठी ४ कोटी रुपये खर्चास प्रशासकीय मान्यता दिली आहे.

Web Title: The question of Belalpur pedestrian bridge will be resolved