ड्रग्ज तस्करीतले पंजाबचे रॅकेट ५ महिन्यांत उद्ध्वस्त; २५ जणांना अटक, ३ कोटी ३१ लाखांचा मुद्देमाल जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2026 14:55 IST2026-01-01T14:53:33+5:302026-01-01T14:55:03+5:30

या ड्रग्ज तस्करांकडून ३ कोटी ३१ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, या टोळीवर ‘मोक्का’अंतर्गत कारवाईसाठी पोलिसांच्या हालचाली सुरू आहेत.

Punjab drug smuggling racket busted in 5 months; 25 arrested, goods worth Rs 3 crore 31 lakh seized | ड्रग्ज तस्करीतले पंजाबचे रॅकेट ५ महिन्यांत उद्ध्वस्त; २५ जणांना अटक, ३ कोटी ३१ लाखांचा मुद्देमाल जप्त

ड्रग्ज तस्करीतले पंजाबचे रॅकेट ५ महिन्यांत उद्ध्वस्त; २५ जणांना अटक, ३ कोटी ३१ लाखांचा मुद्देमाल जप्त

नवी मुंबई : ड्रग्जविरोधी कारवाईत नवी मुंबई पोलिसांनी पाच महिन्यांत पंजाबचे रॅकेट उद्ध्वस्त करून २५ जणांना अटक केली आहे. यात सहभागी असलेल्या १० जणांचा अद्यापही पोलिस शोध घेत आहेत. या ड्रग्ज तस्करांकडून ३ कोटी ३१ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, या टोळीवर ‘मोक्का’अंतर्गत कारवाईसाठी पोलिसांच्या हालचाली सुरू आहेत.

नवी मुंबईत पंजाबमधून ड्रग्ज पुरवले जात असल्याचे पोलिसांच्या न निदर्शनात आले होते.  सीबीडीत लॉजमध्ये केलेल्या कारवाईत ड्रग्जविक्रीसाठी आलेले पंजाबचे काही जण हाती लागले होते. या कारवाईत संबंधितांचे इतरही साथीदार नवी मुंबईत ड्रग्जपुरवठा करत असल्याची माहिती पोलिसांच्या हाती लागली होती. त्यावरून अद्यापपर्यंत पोलिसांनी ५ कारवायांमध्ये आंतरराज्य रॅकेट उद्ध्वस्त केले आहे. याप्रकरणी तळोजा, कळंबोली, सीबीडी, एपीएमसी व एनआरआय पोलिस ठाण्यांत गुन्हे दाखल आहेत. त्यामध्ये २५ जणांना अटक झाली असून सर्वजण पंजाबचे राहणारे आहेत. त्यांच्याकडून ३ कोटी ३१ लाखांचे अमली पदार्थ जप्त केले आहेत. त्यामध्ये अफिम, हेरॉईनचा समावेश आहे. या टोळीत सहभाग निष्पन्न झालेल्या इतर १० जणांचा पोलिस शोध घेत आहेत. त्यावरून पंजाबमधून नवी मुंबईत ड्रग्जपुरवठा करणारी ही सर्वात मोठी टोळी असल्याचे उघड झाले आहे. यामुळे त्यांच्यावर ‘मोक्का’अंतर्गत देखील कारवाई होण्याची शक्यता आहे. 

थर्टी फर्स्टच्या पार्ट्यांवर वॉच
नवी मुंबईला ड्रग्जमुक्त करण्यासाठी पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांचे प्रयत्न सुरू आहेत. त्यानुसार गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकासह स्थानिक पोलिसांकडून ड्रग्जविरोधी कारवायांचा धडाका सुरू आहे. त्यामध्ये अमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ निरीक्षक संदीप निगडे यांच्या पथकाने पंजाबच्या या ड्रग्स तस्करी करणाऱ्या रॅकेटच्या मुसक्या आवळल्या, तर थर्टी फर्स्टच्या अनुषंगानेदेखील पार्ट्यांमध्ये ड्रग्जपुरवठा, वापर होतोय का याकडेही लक्ष ठेवले जात आहे.

Web Title : नवी मुंबई में पंजाब का ड्रग रैकेट ध्वस्त; 25 गिरफ्तार

Web Summary : नवी मुंबई पुलिस ने पंजाब के ड्रग रैकेट का भंडाफोड़ किया, 25 गिरफ्तार, ₹3.31 करोड़ के ड्रग्स जब्त। दस और संदिग्ध वांछित। गिरोह पर मकोका लगेगा। पुलिस नए साल की पार्टियों में ड्रग्स के इस्तेमाल पर सतर्क है।

Web Title : Punjab Drug Racket Busted in Navi Mumbai; 25 Arrested

Web Summary : Navi Mumbai police dismantled a Punjab-based drug racket, arresting 25 and seizing ₹3.31 crore worth of drugs. Ten more suspects are wanted. The gang faces MCOCA charges. Police are vigilant against drug use at New Year's Eve parties.