उरण महावितरणची २८ वीज चोरांवर दंडात्मक कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2024 19:39 IST2024-01-09T19:38:39+5:302024-01-09T19:39:18+5:30
१४ लाख ५० हजारांहून अधिक रक्कम दंडासह वसुल

उरण महावितरणची २८ वीज चोरांवर दंडात्मक कारवाई
उरण : उरण महावितरण कंपनीकडून वीज चोरी प्रकरणी डिसेंबर ते ६ जानेवारीपर्यंत करण्यात आलेल्या कारवाईत २८ वीज चोराकडून १४ लाख ५० हजारांहून अधिक रक्कम दंडासह वसुल करण्यात आल्याची माहिती महावितरण कंपनीने दिली आहे.
उरण उपविभागात अनेक ठिकाणी वीज चोरीच्या घटनांत वाढ झाली आहे. याचा फटका सर्वसामान्य नियमित वीज देयके भरणाऱ्या ग्राहकांना बसत आहे. त्यामुळे उरणच्या महावितरणच्या उपविभागात वीजचोरी विरोधात धडक कारवाईला सुरुवात केली होती.उरण शहर, जासई, करंजा, विंधणे, जसखार या गावात डिसेंबर-२३ ते ६ जानेवारीपर्यंत २८ विजचोरांवर कारवाई केली आहे.या वीज चोरी प्रकरणी १४ लाख ५० हजारांहून अधिक रक्कम दंडासह वसुल करण्यात आल्याची माहिती उरण महावितरणचे उप कार्यकारी अभियंता विजय सोनावले यांनी दिली.