शहरं
Join us  
Trending Stories
1
सुपरओव्हरमध्ये दिल्लीचा राजस्थानवर रोमहर्षक विजय!
2
गुरुची विद्या गुरुलाच? ठाकरेंनी आतल्या गोटातून माहिती काढली; भाजपाला शह देण्याची रणनीती आखली
3
अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स कुटुंबासह लवकरच भारत दौऱ्यावर; टॅरिफच्या गोंधळामध्ये पंतप्रधान मोदींशी घेणार भेट
4
कर्नाटकात मुस्लिमांना 4 टक्के आरक्षण मिळणार की नाही? आता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ठरवणार!
5
भारतीय धावपटूचं शर्यत जिकण्याआधीच सेलीब्रेशन, मागचा पुढं गेला आणि गोल्ड हुकलं!
6
भारतीय विद्यार्थ्याने ट्रम्प प्रशासनाविरोधात दाखल केला खटला; अचानक इमिग्रेशन दर्जा रद्द केल्यानंतर कोर्टात धाव
7
उद्धव ठाकरे यांनी हर्षवर्धन सपकाळांची री ओढली, RSSवर टीका केली; म्हणाले, “मला आवडलं की...”
8
ऑलिंपिकमधील क्रिकेट सामने खेळवण्यासाठी ऐतिहासिक ठिकाणाची घोषणा!
9
“आपले कुणी ऐकत नाही, म्हणून बाळासाहेबांचा आवाज वापरण्याचा पोरकटपणा”; भाजपाची ठाकरेंवर टीका
10
“छत्रपती शिवरायांबद्दल एवढेच वाटत असेल, तर शिवजयंतीला देशभरात सुट्टी जाहीर करा”: उद्धव ठाकरे
11
"हिंदूंना घंटा अन् मुस्लिमांना सौगात...! त्या वक्फ बिलाचा आणि हिंदूंचा काडीचा संबंध नाही"; उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल
12
"नेहरू नेहमी उघड्या गाडीतून फिरायचे, पण महाराष्ट्रात...! तुमची मस्ती इकडे नाही चालणार"; नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
13
"पक्षात ज्येष्ठ नेत्यासारखे फिरतात पण साधा बूथ जिंकू शकत नाही"; राहुल गांधींनी काँग्रेस नेत्यांना सुनावलं
14
सासू-जावयाच्या लव्ह स्टोरीचा 'दी एंड'! नेपाळ सीमेजवळ दोघेही ताब्यात; महिलेनं रडत-रडत केला धक्कादायक खुलासा
15
'मला कर्करोग आहे, कोणाला सांगायचे नव्हते"; पत्नीला वेदनादायक मृत्यू देऊन पतीने स्वतःला संपवले
16
तामिळनाडूला जाऊन जबाब नोंदवायला काय हरकत आहे? कुणाल कामराला अटक न करण्याचे कोर्टाचे निर्देश
17
दरोडा दहा लाखाचा अन् तपासात मिळाले अडीच कोटी; ‘लाईव्ह लोकेशन’ मिळवून दरोडा
18
तनिषा भिसे मृत्यू प्रकरण : पोलिसांनी ससूनला सादर केलेल्या अहवालानंतर चर्चा
19
आधी वडेट्टीवार, आता सपकाळ; मंगेशकर कुटुंबावर टीकेचे बाण, म्हणाले, “घटनेवरील मौन अमानुष”
20
गर्भवती मृत्यू प्रकरणामुळे अडचणीत आलेल्या डॉ. घैसास यांना पोलीस प्रोटेक्शन..! 

कडधान्य कडाडले, ज्वारीही महागली; किचनचे बजेट बिघडले!

By नामदेव मोरे | Updated: April 4, 2023 11:30 IST

अवकाळी पावसाचा परिणाम

नामदेव मोरे, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : उन्हाच्या तीव्रतेबरोबर सर्वसामान्य नागरिकांना महागाईच्या झळांचा सामना करावा लागत आहे.  अवकाळी पावसाचा धान्याच्या दरांवर परिणाम झाला आहे.  गहू, ज्वारी बाजरीच्या दरामध्ये वाढ झाली असून डाळी व कडधान्यांच्या दराने शतक ओलांडले आहे. त्यामुळे गृहिणींच्या किचनचे बजेट कोलमडू लागले आहे. धान्य, कडधान्यही आवाक्याबाहेर गेले तर आता खायचे काय, असा प्रश्न सर्वसामान्य ग्राहक विचारत आहेत.

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाही जीवनावश्यक वस्तूंच्या किमती जवळपास १५ ते २० टक्क्यांनी वाढल्या आहेत. गेल्यावर्षी २३ ते २६ रुपये प्रतिकिलो दराने विकली जाणारी बाजरी २७ ते ४२ रुपये व ज्वारी २२ ते २९ रुपये प्रतिकिलोवरून २८ ते ५० रुपयांवर गेली आहे. गव्हाच्या किमती प्रतिकिलो २३ ते ३२ वरून २८ ते ५० रुपये प्रति किलोवर पोहोचल्या आहेत. किरकोळ मार्केटमध्ये चांगल्या दर्जाच्या गहू, ज्वारी, बाजरीने पन्नाशी ओलांडली आहे. उडीदडाळ, मूगडाळ, तूरडाळींनी होलसेल मार्केटमध्येच शंभरी ओलांडली आहे.

अवकाळी पावसामुळे गहू, ज्वारी, बाजरीच्या दरात चांगलीच वाढ झाली आहे. कडधान्याचे दरही सर्वसामान्यांच्या अवाक्याबाहेर केले आहेत. त्यामुळे गृहिणींच्या किचनचे बजटच कोलमडले आहे.

होलसेल मार्केटमधील धान्य डाळींचे प्रतिकिलो बाजारभाव 

वस्तू    २०२२    २०२३बाजरी    २३ ते २६    २७ ते ४२गहू    २३ ते २६    २८ ते ३८गहू लोकवन    २४ ते ३०    २७ ते ३६गहू सीवूर    २९ ते ३२    ३० ते ५० ज्वारी    २२ ते २९    २८ ते ५० हरभरा    ५२ ते ५७    ५० ते ६० मसूर    ७२ ते ७५    ६६ ते ७५मसूरडाळ    ७८ ते ८२    ७१ ते ७८उडीद    ५५ ते ६०    ८० ते १०६उडीदडाळ    ८० ते १००    ८५ ते ११५मूग    ८५ ते १००    ८२ ते ११०मूगडाळ    ८७ ते १०५    ८० ते ११०तूरडाळ    ८५ ते १०५    ७५ ते ११५शेंगदाणे    ८० ते १०५    ९० ते १२० 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईfoodअन्न