शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
2
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
3
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
4
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
5
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
6
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
7
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
8
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
9
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
10
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
11
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
12
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
13
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
14
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
15
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
16
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
17
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
18
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
19
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
20
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय

सायबर सिटीतही रुजतेय पब संस्कृती, : महाविद्यालयीन तरु ण थिरकतात डान्स फ्लोअरवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 01, 2018 7:25 AM

सांस्कृतिक व शैक्षणिक शहर म्हणून नावारूपास येत असलेल्या नवी मुंबईत सध्या रेव्ह पार्टी, डीजे पार्टी, हुक्का पार्टी, डिस्को पार्टी, पूल पार्टीचे पेव फुटले असून, नवी मुंबईत पब संस्कृती उदयास येत आहे. फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप सारख्या सोशल मीडियामार्फत अशा पार्ट्यांची जाहिरात करून अल्पवयीन शालेय व कॉलेज विद्यार्थ्यांना या पार्ट्यांच्या जाळ्यात ओढले जाते व बेकायदेशीर दारू व नशेली पदार्थांची विक्र ी करून यात विद्यार्थ्यांना अडकवले जात आहे.

- प्राची सोनवणेनवी मुंबई : सांस्कृतिक व शैक्षणिक शहर म्हणून नावारूपास येत असलेल्या नवी मुंबईत सध्या रेव्ह पार्टी, डीजे पार्टी, हुक्का पार्टी, डिस्को पार्टी, पूल पार्टीचे पेव फुटले असून, नवी मुंबईत पब संस्कृती उदयास येत आहे. फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप सारख्या सोशल मीडियामार्फत अशा पार्ट्यांची जाहिरात करून अल्पवयीन शालेय व कॉलेज विद्यार्थ्यांना या पार्ट्यांच्या जाळ्यात ओढले जाते व बेकायदेशीर दारू व नशेली पदार्थांची विक्र ी करून यात विद्यार्थ्यांना अडकवले जात आहे. पब संस्कृती ही आजच्या आधुनिक मानसिकतेची गरज बनली असली, तरी मुंबईत झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे.शहरातील मूळ रहिवास असणारा समाज म्हणजे आगरी कोळी. आगरी कोळी संस्कृतीमुळे नावारूपाला आलेल्या नवी मुंबई शहरात सध्या नाइट लाइफ उदयास आली आहे. नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी तरु णाईकडून वेगवेगळ्या पार्ट्यांचे प्लॅन आखण्यात आले असून, यामध्ये पब संस्कृतीला अधिक प्राधान्य दिले जाते. नव्या वर्षाच्या स्वागतासाठी डान्स-गाण्यांवर धमाल करत, मौज-मस्तीचे नियोजन झाले असून, त्यासाठी शहरात विविध ठिकाणी डान्स फ्लोअर सज्ज झाले आहेत. शहरातल्या अनेक भागात तरु णांना आकर्षित करण्यासाठी विविध पब आणि हॉटेल्सकडून आकर्षक आॅफर्स दिल्या जात असल्याने तरुणांमध्ये याचे आकर्षण वाढत आहे. त्यामुळे यंदाच्या न्यू ईयर सेलिब्रेशनला तरु णाई ‘चिल’ होण्यासाठी पब सारखे पर्याय निवडत आहे. मुंबई, पुण्यानंतर आता नवी मुंबईमध्येही नाइट लाइफ पाहावयास मिळत आहे. अख्खी रात्र सेलिब्रेशन करायचा ट्रेंड वाढला आहे. ही बाब लक्षात घेऊन शहरातील अनेक उच्चभ्रू वस्त्यांमध्ये असलेले पब्स तरु णांना आकर्षक आॅफर देत आहेत. त्यामध्ये कपल आॅफर्स, ग्रुप आॅफर्स, पार्टी विथ लिकर अ‍ॅण्ड डीनर अशा अनेक प्रकारच्या आॅफर्स आहेत. त्यासाठी निरनिराळ्या प्रकारच्या सवलती हॉटेलांनी देऊ केल्या आहेत. त्यामुळे थर्टीफर्स्टची संपूर्ण रात्र एन्जॉय करण्यासाठी पबमधील बुकिंग आठवड्याभरापासूनच फुल्ल आहेत. पबमधील पार्टीमध्ये कॉलेज तरुणांचा मोठ्या प्रमाणात सहभाग असून, या वयोगटात अमली पदार्थांचे सेवन, व्यसनांच्या आहारी जाण्याचे प्रमाण वाढले आहे. नवी मुंबईसारख्या शहरामध्येही अनधिकृत पब्स सुरू करण्यात आले असून, सेलिब्रेशनसाठी मुंबईकडे वळणारी पावले आता नवी मुंबईकडे वळू लागली आहेत.बॉलिवूड नाइट, डिस्को, जॅझ, पॉप, इंटरनॅशनल साँग्स अशा तरु णांना थिरकायला लावणाºया विविध संगीत प्रकारांवर आधारित गाणी पबमध्ये वाजविली जातात. रात्री ८ वाजता पार्टी सुरू झाली की, अगदी पहाटेपर्यंत सलग स्पीकरवर वाजत राहतील एवढी गाण्यांची तयारी पब्स चालकांकडून केली जाते. विविध प्रकारच्या गाण्यांच्या हँगओव्हरमध्ये झिंगण्यासाठी शहरातील डान्स फ्लोअर गेल्या महिन्याभरापासून तयारीला लागले होते.बॉलिवूड नाईट, डिस्को, जॅझ, पॉप, इंटरनॅशनल साँग्स अशा तरु णांना थिरकायला लावणार्या विविध संगीत प्रकारांवर आधारित गाणी पबमध्ये वाजविली जातात . रात्री आठ वाजता पार्टी सुरू झाली की अगदी पहाटेपर्यंत सलग स्पीकरवर वाजत राहतील एवढी गाण्यांची तयारी पब्स चालकांकडून केली जाते.विविध प्रकारच्या गाण्यांच्या हँगओव्हरमध्ये झिंगण्यासाठी शहरातील डान्स फ्लोअर गेल्या महिन्याभरापासून तयारीला लागले होते.नाईट लाईफमुळे नवी मुंबईही आता रात्री उशिरापर्यंत सुरू असल्याचे पहायला मिळते. नाईट लाईफला पाठिंबा देताना सर्वात मोठा धोका आहे, तो महिलांवरील वाढत्या अत्याचाराचा. रात्रभर तरु णाई आण िलोक मौजमजा करणार आण िएकाही तरु णीवर अथवा महिलेवर अतिप्रसंग अथवा बलात्कार होणार नाही, शहरातील पोलीस तसेच प्रशासन देणार का? अशा बिकट परिस्थितीत रात्रीच्या अंधारात किती गंभीर घटना घडू शकतात.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई