शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
2
JP Nadda : "केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर
3
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
4
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
5
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजात तेजी, Nestle च्या शेअर्समध्ये तेजी, JSW घसरला
7
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
8
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
9
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
10
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
11
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
12
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
13
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
14
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
15
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
16
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
17
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
18
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
19
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
20
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका

चौथ्या बंदराचे उद्घाटन लांबणीवर, कार्यक्रम १५ जानेवारीपर्यंत पुढे ढकलला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2017 2:36 AM

उरण : इन्फ्रास्ट्रक्चरची अनेक कामे मार्गी लागली नसल्याने, जेएनपीटी बंदरांतर्गत सात हजार ९१५ कोटी खर्चाचे देशातील सर्वात मोठ्या लांबीचे बंदर डिसेंबर अखेर कार्यान्वित होण्याच्या आशा मावळल्या आहेत.

उरण : इन्फ्रास्ट्रक्चरची अनेक कामे मार्गी लागली नसल्याने, जेएनपीटी बंदरांतर्गत सात हजार ९१५ कोटी खर्चाचे देशातील सर्वात मोठ्या लांबीचे बंदर डिसेंबर अखेर कार्यान्वित होण्याच्या आशा मावळल्या आहेत. त्यामुळे बंदराच्या उद्घाटनाचा कार्यक्रम येत्या १५ जानेवारीपर्यंत पुढे ढकलण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या बंदराचे उद्घाटन करण्याचा कार्यक्रम आखण्याच्या हालचाली सुरू असल्या, तरी २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून प्रमुख अतिथी म्हणून सिंगापूरच्या पंतप्रधानांच्या हस्ते चौथ्या बंदराचे उद्घाटन करण्याचा प्रयत्न शिपिंग मंत्रालयाकडून सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.जेएनपीटीअंतर्गत खासगीकरणातून चौथे बंदर उभारण्यात येत आहे. परकीय गुंतवणुकीतून म्हणजेच एफडीआयमधून उभारण्यात येणारे हे देशातील पहिलेच बंदर होय. देशातील सर्वात लांबीचे आणि वर्षाकाठी ४८ लाख कंटेनर हाताळणी करण्याची क्षमता असलेल्या बंदरावर ७९१५ कोटी रुपये खर्च होणार आहेत. दोन टप्प्यात उभारण्यात येणाºया बंदराच्या पहिल्या टप्प्याचे काम डिसेंबर अखेर पूर्ण करण्याचा संकल्प होता. मात्र, आवश्यक पायाभूत सुविधांची अनेक कामे अर्धवट आहेत. त्यामुळे डिसेंबरअखेर चौथे बंदर कार्यान्वित करण्याच्या मनसुब्यावर र्तूतास तरी चांगलेच पाणी फेरले गेले आहे.त्यामुळे जेएनपीटी आणि सिंगापूर सरकार मिळून उभारण्यात येत असलेले जेएनपीटीचे चौथ्या बंदराचे उद्घाटन १५ जानेवारीपर्यंत करण्याचा इरादा बंदर प्रशासनाने जाहीर केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशातील मोठ्या लांबीच्या आणि मोठ्या बंदराचे उद्घाटन करण्याच्या हालचालींना सध्या वेग आला आहे. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून प्रमुख अतिथी म्हणून सिंगापूरचे पंतप्रधान दिल्लीत उपस्थित राहणार असल्याचे सांगितले जात आहे. या दुग्धशर्कराचा योग साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सिंगापूरचे पंतप्रधान यांच्या प्रमुख उपस्थितीत जेएनपीटीच्या चौथ्या बंदर उद्घाटनच्या शाही कार्यक्रमाचा बेत केंद्रातील शिपिंग मंत्रालयाकडून आखण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. यामुळे जेएनपीटीच्या चौथ्या बंदराच्या उद्घाटनाचा कार्यक्रम १५ जानेवारी ऐवजी २६ जानेवारीनंतरच उरकून घेण्याची तयारीही जेएनपीटी बीएमसीटीने चालविली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.जेएनपीटीच्या चौथ्या बंदराच्या उद्घाटनाचा कार्यक्रम १५ जानेवारी ऐवजी २६ जानेवारीनंतरच उरकून घेण्याची तयारीही जेएनपीटी बीएमसीटीने चालविली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.