शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर, ट्रम्प टॅरिफ मुद्द्यांवर विरोधक आक्रमक, आजपासून संसद अधिवेशन; सर्व मुद्द्यांवर चर्चेस सरकार तयार
2
उड्डाण करताच डाव्या बाजूचं इंजिन पेटलं; आगीमुळे बोईंगचे इमर्जन्सी लँडिंग
3
Latur: मारहाणीनंतर ‘छावा’चे कार्यकर्ते रात्री उशिरा रस्त्यावर; राष्ट्रवादीचे बॅनर फाडले
4
आधी ‘तिने’ तीन कोटी उकळले,  नंतर आणखी १० कोटी मागितले! ‘हनी ट्रॅप’ची चर्चा
5
ईडी कोणी ड्रोन नाही की सुपरकॉप नाही...मद्रास उच्च न्यायालयाचे ईडीच्या कार्यशैलीवर ताशेरे
6
योगींचा दिल्ली दौरा अन् प्रदेशाध्यक्ष निवडीची चर्चा; ओबीसी चेहरा किंवा महिला नेत्याची होऊ शकते निवड
7
नोकरीसाठी अडचण नको म्हणून चक्क पोटच्या मुलीलाच विकले
8
हवाई सुंदरीवर अत्याचार; क्रू मेंबरला अटक, मीरा रोड येथील घटना
9
प्रचंड उष्म्यामुळे विद्यार्थ्यांच्या शालेय शिक्षणावर होतोय परिणाम, दीड वर्षांपर्यंत होऊ शकते घट
10
जगातील कोणीही भारताला आदेश देऊ शकत नाही, ट्रम्प यांचा दावा अन् उपरराष्ट्रपतींचे खडेबोल
11
इस्रायल की सशस्त्र टोळ्यांचा हल्ला? गाझामध्ये मदतीची प्रतीक्षा करणाऱ्यांवरच गोळीबार, ७३ जण ठार
12
तरुणांना भाषणबाजी नको, रोजगार हवा! राहुल गांधी यांनी व्यक्त केली चिंता
13
कृषिमंत्री कोकाटेंच्या मोबाइलवर पत्ते; विधानपरिषदेतील व्हिडीओने खळबळ
14
कोकाटेंचा राजीनामा मागितला, तटकरेंना निवेदन देत पत्ते फेकले, छावा आणि अजितदादांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा
15
"आमच्या निवेदनाला लाथाबुक्क्यांनी उत्तर देत असाल तर…’’, विजय घाडगे यांची संतप्त प्रतिक्रिया 
16
ऑपरेशन सिंदूरवेळी जीव धोक्यात घालून केली जवानांना मदत, आता लष्कराने १० वर्षांच्या मुलाला दिलं मोठं बक्षीस
17
"माणिकराव कोकाटे यांचा 'तो' व्हिडीओ AIच्या मदतीनं, मी स्वतः..."; भाजप आमदाराचा दावा
18
राजस्थानात मुसळधार पाऊस, अजमेरमध्ये तरुण वाहून जाता-जाता बचावला; असा वाचला जीव, बघा VIDEO
19
प्रवेश करताच लिफ्ट बंद, प्रवीण दरेकरांसह १७ जण अडकले, १० मिनिटं चालला थरार, अखेर दरवाजा तोडून केली सुटका
20
मांत्रिकाकडून पूजा केली, खड्डा खणला, तेवढ्यात आले पोलीस, गुप्तधन शोधताना पाच जणांना अटक

रबाळेतील फरसाणच्या कारखान्यावर छापा, अन्न व औषध प्रशासनाची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2019 00:12 IST

टाकाऊ खाद्यतेलाचा वापर करून फरसाण तळणाऱ्या कारखान्यावर अन्न व औषध प्रशासनाने छापा टाकून कारवाई केली आहे.

नवी मुंबई : टाकाऊ खाद्यतेलाचा वापर करून फरसाण तळणाऱ्या कारखान्यावर अन्न व औषध प्रशासनाने छापा टाकून कारवाई केली आहे. रबाळे नाका येथे हा कारखाना चालवला जात होता. हॉटेल्समध्ये वापरलेले काळे खाद्यतेल कमी भावाने खरेदी करून ते फरसाण तळण्यासाठी वापरले जात होते.रबाळे नाका येथे कोणत्याही व्यवसाय परवान्याशिवाय हा कारखाना चालवला जात होता. त्याठिकाणी शहरातील हॉटेल्समध्ये वापरण्यात आलेले खाद्यतेल फरसाण तळण्यासाठी वापरले जात होते. अशा प्रकारे हॉटेल्समधून निघणारे तेल जमा करून ते सदर कारखान्याला पुरवले जात असल्याची बाब नयन म्हात्रे यांच्या निदर्शनास आली होती. यामुळे त्यांनी ठिकठिकाणच्या हॉटेलमधून तेल जमा करणाºया वाहनाचा पाठलाग केला असता या कारखान्याची माहिती समोर आली. यानुसार त्यांनी अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार केली होती. त्यानुसार अन्न व औषध प्रशासन अधिकारी अरविंद कोंडीलकर यांच्या पथकाने सोमवारी त्याठिकाणी छापा टाकला. यावेळी सदर फरसाण कारखान्याकडे व्यवसाय परवाना देखील नसल्याचे उघड झाले. यानुसार त्याला व्यवसाय बंद करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. तसेच तिथल्या तेलाचे तीन नमुने घेवून ते प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. या तेलाच्या अहवालानंतर संबंधितावर योग्य कारवाई केली जाणार असल्याचेही कोंडीलकर यांनी सांगितले. सदर कारखान्यात वापरास अयोग्य असलेल्या खाद्यतेलापासून फरसाण तळले जायचे. तेच फरसाण शहरातील अनेक ठिकाणच्या व्यावसायिकांना विक्रीसाठी दिले जात होते.मात्र या प्रकारामुळे शहरात टाकाऊ खाद्यतेलाचा पुनर्वापर करून नागरिकांच्या आरोग्याशी खेळ केला जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. हॉटेल्समधून निघणारे टाकाऊ खाद्यतेल जमा करून त्यापासून बायोडिझेल बनवण्याची शासनाची संकल्पना आहे. त्यानुसार हॉटेल्समध्ये वापरलेले खाद्यतेल जमा करून ते संबंधित संस्थेकडे पुरवण्याचे काम काही संघटनांना देण्यात आले आहे. मात्र हॉटेल व्यावसायिकांकडून टाकाऊ तेलातून देखील नफा मिळवण्यासाठी अशा अवैध कारखान्यांना पुरवले जात असल्याचे या प्रकरणातून उघड झाले आहे.