शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

नवी मुंबई विमानतळाला प्रक्रियायुक्त पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2022 09:07 IST

चार टप्प्यांत हे विमानतळ पूर्ण केले जाणार असून,  सध्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्याचे काम प्रगतिपथावर आहे.

- कमलाकर कांबळे लोकमत न्यूज नेटवर्क नवी मुंबई :  सिडकोच्या दक्षिण नवी मुंबईचा वेगाने विस्तार होत आहे. या विभागात अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प उभारले जात आहेत. त्यामुळे पाण्याची गरज दिवसेंदिवस वाढत आहे. अशातच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी २१.८२ एमएलडी पाणी लागणार असल्याचा अंदाज पर्यावरणविषयक अहवालात व्यक्त केला आहे. यातील १०.६१ एमएलडी पिण्यायोग्य, तर उर्वरित ११.२१ एमएलडी पुनर्प्रक्रिया केलेले असणार असल्याने त्यासाठी तीन एसटीपी प्लॅन्ट प्रस्तावित केले आहेत.

चार टप्प्यांत हे विमानतळ पूर्ण केले जाणार असून,  सध्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्याचे काम प्रगतिपथावर आहे. यासाठी डिसेंबर २०२४ ची डेडलाइन आहे, तर तिसरा टप्पा २०२८ मध्ये आणि चौथा टप्पा २०३२ मध्ये पूर्ण होणार आहे. या पार्श्वभूमीवर नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडने (एनएमआयए) एन्व्हायर्नमेंट  इम्पॅक्ट असेसमेंट अहवाल तयार केला आहे. त्यानुसार विमानतळाचा अंतिम टप्पा पूर्ण झाल्यानंतर २१.८२ एमएलडी पाण्याची गरज भासणार असून, यापैकी १०.६१ एमएलडी पिण्यायोग्य, तर उर्वरित  ११.२१ एमएलडी पुनर्प्रक्रिया केलेले असेल, असे नमूद केले आहे.  पिण्यायोग्य पाण्याची पूर्तता करण्याची जबाबदारी सिडकोवर साेपविली आहे, तर प्रक्रिया केलेले ११.२१ एमएलडी पाणी स्वच्छतागृहे, उद्याने, साफसफाईसाठी वापरण्यात येणार आहे. त्यासाठी तीन एसटीपी प्लॅन्ट प्रस्तावित केले असले तरी, ते कागदावरच आहेत. नैना तसेच प्रस्तावित विविध गृहप्रकल्पांमुळे भविष्यात पाण्याची गरज वाढणार असून २०५० पर्यंतच्या लोकसंख्येचा ढोबळ अंदाज बांधून नियोजन करण्यासाठी तज्ज्ञांची समिती स्थापन केली आहे. 

    सिडकोने पाण्यासाठी २०५० पर्यंतचे नियोजन केले आहे. त्या वेळच्या लोकसंख्येनुसार या संपूर्ण क्षेत्रासाठी १२७५ एमएलडी पाण्याची गरज लागेल, असा ढोबळ अंदाज आहे.      पाण्याचा कायमस्वरूपी स्रोत म्हणून सिडको बाळगंगा धरणाकडे पाहत असून, त्याचे काम तांत्रिक अडचणीमुळे थांबले आहे. असे असले तरी, पुढील पाच- सहा वर्षांत ते पूर्ण करण्याचा सिडकोचा प्रयत्न आहे. ते पूर्ण केल्यास ३५० एमएलडी पाणी मिळेल, असा अंदाज आहे.      सिडकोने अलीकडेच राज्य सरकारकडून कोंढाणे धरण हस्तांतरित करून घेतले असून, त्यातून नैना क्षेत्राची पाण्याची गरज भागणार आहे.     २०२८ पर्यंत त्याचे काम पूर्ण करण्याचा निर्धार असला तरी, सध्या केवळ कागदी घोडेच नाचविले जात असल्याने पाणीपुरवठ्याची डोकेदुखी सिडकोस सताविणार आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई