प्रकल्पग्रस्तांच्या गरजेपोटी घराचा प्रश्न लवकरच सोडवणार - मुख्यमंत्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2018 13:44 IST2018-05-21T13:44:35+5:302018-05-21T13:44:35+5:30
शहरातल्या प्रकल्पगस्तांच्या गरजेपोटी घरांचा शासनाने निर्णय घेतला आहे. मात्र त्यात काही अडचणी समोर आल्या आहेत. यासंदर्भात निवेदनं देखील प्राप्त झालेली आहेत.

प्रकल्पग्रस्तांच्या गरजेपोटी घराचा प्रश्न लवकरच सोडवणार - मुख्यमंत्री
नवी मुंबई - शहरातल्या प्रकल्पगस्तांच्या गरजेपोटी घरांचा शासनाने निर्णय घेतला आहे. मात्र त्यात काही अडचणी समोर आल्या आहेत. यासंदर्भात निवेदनं देखील प्राप्त झालेली आहेत. त्यानुसार तातडीने लवकरच निर्णय घेऊन गरजेपोटी घरांचा प्रश्न सोडवला जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रबाळे येथे दिले. ठाणे-बेलापूर मार्गातील तीन पुलांच्या उद्घाटन प्रसंगी त्यांनी प्रकल्पग्रस्तांना दिलासा दिला. घणसोली- तळवली उड्डाणपूल, महापे भुयारी मार्ग, पावणे येथील उड्डाणपुल यांचे उद्घाटन यासह ठाणे-बेलापूर मार्ग व राष्ट्रीय महामार्ग 4ला जोडणारा मार्ग आणि कोपरी (ठाणे) येथील रेल्वे उड्डाणपूल यांचे भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते संपन्न झाला.