शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील खासगी डॉक्टरांचे शरद पवारांना साकडे, कोरोनाच्या काळात हवे विमा कवच​​​​​​​

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2020 10:55 IST

कोरोनाच्या काळात अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या कोविड योद्धयाचे निधन झाल्यास शासनाने ५० लाख रुपयांचा विमा घोषित केला आहे. या विम्यात खासगी डॉक्टरांचाही समावेश करण्याची मागणी सुरुवातीपासूनच राज्यभरातील विविध संघटनांकडून होत आहे. (Sharad Pawar)

नवी मुंबई : कर्तव्य बजावताना कोरोना होऊन शहीद झालेल्या डॉक्टरांना विम्याची रक्कम देण्याचे प्रस्ताव फेटाळण्यात आले आहेत. त्यामुळे नवी मुंबईसह राज्यभरातील डॉक्टरांनीशरद पवार यांची शुक्रवारी भेट घेऊन आपली व्यथा मांडली. 

कोरोनाच्या काळात अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या कोविड योद्धयाचे निधन झाल्यास शासनाने ५० लाख रुपयांचा विमा घोषित केला आहे. या विम्यात खासगी डॉक्टरांचाही समावेश करण्याची मागणी सुरुवातीपासूनच राज्यभरातील विविध संघटनांकडून होत आहे. अशातच राज्य सरकारने ऑगस्टमध्ये परिपत्रक काढून खासगी डॉक्टरांनाही हा विमा लागू होणार असल्याचे सांगितले. 

त्यानुसार, कोरोनामुळे राज्यभरात शहीद झालेल्या डॉक्टरांच्या नातेवाइकांनी मरणोत्तर विम्यासाठी अर्ज केले, परंतु प्राप्त झालेले अर्ज अधिकारी फेटाळत असल्याचा आरोप हिम्पाम संघटनेचे महाराष्ट्र अध्यक्ष डॉ.सोमनाथ गोसावी यांनी सांगितले. 

यामुळे राज्यभरातील डॉक्टरांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव पसरत असताना, तो नियंत्रणात करण्यासाठी खासगी डॉक्टर झटत होते. परिणामी, अनेक डॉक्टरांनाही कोरोनाची लागण झाली असून, त्यात राज्यात १०० हून अधिक डॉक्टरांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे शहीद डॉक्टरांच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्याच्या मागणीसाठी डॉक्टरांच्या विविध संघटनांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन आपले निवेदन दिले. 

याप्रसंगी हिम्पामचे महाराष्ट्र अध्यक्ष डॉ.सोमनाथ गोसावी, निमाचे माजी उपाध्यक्ष डॉ. विनायक म्हात्रे, डॉ.अविनाश भोंडवे, डॉ.चंद्रकांत पाटील, डॉ.एम.आर. काटकर, डॉ.जितेंद्र पवार आदी उपस्थित होते. यावेळी पवार यांनी डॉक्टरांच्या समस्या समजून घेऊन शासन स्तरावर त्या सोडविण्याचे प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिल्याचे शिष्टमंडळाने सांगितले. 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारdoctorडॉक्टरhospitalहॉस्पिटलcorona virusकोरोना वायरस बातम्या