घरफोडी करणाऱ्यास अटक
By Admin | Updated: August 28, 2015 23:33 IST2015-08-28T23:33:46+5:302015-08-28T23:33:46+5:30
कोपरखैरणे पोलिसांनी रात्रीच्या गस्तीदरम्यान घरफोडी करणाऱ्या एकाला अटक केली आहे. त्याचा दुसरा साथीदार फरार असून अटक केलेल्या तरुणाने पाच गुन्ह्यांची कबुली दिली आहे

घरफोडी करणाऱ्यास अटक
नवी मुंबई : कोपरखैरणे पोलिसांनी रात्रीच्या गस्तीदरम्यान घरफोडी करणाऱ्या एकाला अटक केली आहे. त्याचा दुसरा साथीदार फरार असून अटक केलेल्या तरुणाने पाच गुन्ह्यांची कबुली दिली आहे. त्याच्याकडून १ लाख २१ हजारांचा चोरीचा ऐवज जप्त झाला आहे.
कोपरखैरणे परिसरात वरिष्ठ निरीक्षक सतीश गायकवाड, निरीक्षक विजय तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवारी रात्री परिसरात गस्त सुरू होती. गस्तीदरम्यान सहाय्यक निरीक्षक विक्रम बनसोडे, उपनिरीक्षक संभाजी कटारे यांच्या पथकाने एका संशयिताला ताब्यात घेतले. पोलीस खाक्या दाखवताच त्याने साथीदाराच्या मदतीने घरफोड्या केल्याची कबुली दिली. पोलिसांनी पाच गुन्ह्यांची उकल करून त्याच्याकडून १ लाख २१ हजार रुपये किमतीचे चोरीचे सोन्याचे दागिने जप्त केले. प्रेमलुक मंडल (२१) असे या तरुणाचे नाव आहे, तर त्याचा दुसरा साथीदार फरार असून त्याचा शोध पोलीस घेत आहेत. (प्रतिनिधी)