शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
2
बिहारच्या राजकारणात नवं समीकरण! भाजपाला पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपद; सम्राट चौधरी घेणार शपथ, निशांत कुमार उपमुख्यमंत्री
3
नेस्को ड्रग्ज पार्टीचे कल्याण कनेक्शन; दोघांच्या मृत्यूनंतर ड्रग्ज देणाऱ्याला पहाटे अटक, तिसऱ्याचा शोध सुरु
4
“अभी तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है…”; मुंबईतून इराणचे अमेरिकेला थेट प्रत्युत्तर
5
NEFT vs RTGS vs IMPS vs UPI: पैसे ट्रांसफर करण्यासाठी कोणता पर्याय कधी वापरावा?
6
कोण आहेत पिरोजशा? ज्यांच्या हाती आली १२७ वर्ष जुन्या Godrej ची धुरा, १.५६ लाख कोटींचं आहे साम्राज्य
7
वडिलांनी मजुरी केली, दागिने विकून आईनं मुलासाठी बूट खरेदी केले; IPL मध्ये चमकला साकीब हुसैन
8
साधी राहणी अन् कोट्यवधींची मालमत्ता! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह वादाच्या भोवऱ्यात
9
फॅमिली कार घ्यायचीय? ८.८० लाखांची ही ७ सीटर पडली सर्वांवर भारी! टोयोटा आणि महिंद्राला मागे टाकत ठरली नंबर १; पाहा टॉप-१० यादी
10
दक्षिण चीन सागरात १७ हजार सैनिक का जमले?; चीनच्या वर्चस्वाला थेट आव्हान देण्याची ७ देशांची तयारी
11
"आशाई, हे तात्पुरतं 'गुडबाय'! पण मला माहितीये..."; आशा भोसलेंची नात जनाईची भावूक पोस्ट
12
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
13
लग्नाचा मांडव की लुटीचा अड्डा? 'लुटेरी दुल्हन'चा थरार; अशी करायचे फसवणूक
14
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
15
एसी लोकल सांगाड्यापासून नॉन एसी गाड्या, कुर्ला कारशेडमध्ये दाखल, ५,७०० प्रवासी करू शकतील प्रवास
16
पराभवांतून धडा घ्या किंवा एकटे पडून राहा! सलग तिसऱ्या पराभवानंतर कर्णधार हार्दिक संतापला
17
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
18
Video - १२ महिन्यांत फेडलं ८० लाखांचं कर्ज; अमेरिकेतील भारतीय तरुणीच्या कर्तृत्वाने जग अवाक
19
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
20
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
Daily Top 2Weekly Top 5

चिन्ह वाटपाआधीच प्रचार संघर्ष समितीला पडणार महागात

By admin | Updated: November 18, 2016 03:48 IST

अलिबागमधील नगरपालिकेच्या निवडणुकीत शेकापसह काँग्रेस-भाजपा पुरस्कृत असणाऱ्या संघर्ष समितीने चिन्ह वाटपाआधीच

अलिबाग : अलिबागमधील नगरपालिकेच्या निवडणुकीत शेकापसह काँग्रेस-भाजपा पुरस्कृत असणाऱ्या संघर्ष समितीने चिन्ह वाटपाआधीच प्रचार केल्याने त्यांची चौकशी करण्यात येईल, असे राज्याचे निवडणूक आयुक्त ज.स.सहारिया यांनी स्पष्ट केले. राज्याच्या निवडणूक आयुक्तांच्या या संकेतामुळे शेकाप, काँग्रेस आणि भाजपा समोरील अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.नगरपंचायत, नगरपरिषद निवडणुकी संदर्भात सहारिया यांनी गुरुवारी अलिबाग येथे विभागीय आढावा घेतला. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात त्यांची पत्रकार परिषद पार पडली. त्याप्रसंगी सहारिया बोलत होेते. अलिबाग नगरपालिकेच्या निवडणुकीत शेकापचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार प्रशांत नाईक आणि नगरसेवकपदाचे उमेदवार अनिल चोपडा यांच्या उमेदवारीबाबत संघर्ष समितीकडून हरकत घेण्यात आली होती; परंतु निवडणूक अधिकारी सर्जेराव सोनावणे यांनी त्यांच्या हरकती फेटाळून लावल्या होत्या. त्याविरोधात अलिबागच्या जिल्हा न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. दरम्यानच्या कालावधीत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनानुसार अलिबाग नगरपरिषद वगळता उर्वरित आठ नगरपरिषदेतील निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात आले होते. अलिबाग नगरपालिकेचे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याने निवडणूक चिन्हांचे वाटप १९ नोव्हेंबर रोजी ठेवण्यात आले होते; परंतु असे असताना शेकापने कपबशी चिन्हासह प्रचाराचे बॅनर विविध ठिकाणी लावले, तसेच त्यांचे उमेदवार कपबशीचे चिन्हही गळ्यात, शर्टवर लावून प्रचार करीत होते. त्याचप्रमाणे काँग्रेस-भाजपा या संघर्ष समितीनेही शिटी, हॅट, नारळ अशा चिन्हांचा वापर करीत प्रचाराचे रान पेटवले आहे.चिन्हाचे वाटप झालेले नसताना प्रचार कसा करू शकतात, त्याविरोधात आयोग तक्रारीची वाट बघणार का, सुमोटो कारवाई करणार? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता निवडणूक आयुक्त सहारिया यांनी निवडणूक आयोगाचे सचिव शेखर चन्ने, जिल्हाधिकारी शीतल तेली-उगले यांना विचारणा केली. त्यावेळी त्यांना काहीच उत्तर देता आले नाही. सहारिया यांनी याप्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले. चिन्ह वाटपाआधीच प्रचार केल्याने मतदारांची दिशाभूल केल्याचाच प्रकार आहे. त्याविरोधात निवडणूक आयुक्तांनी घेतलेल्या या परखड भूमिकेमुळे शेकापसह, काँग्रेस-भाजपा यांच्या संघर्ष समितीला फटका बसणार असल्याचे बोलले जाते.