शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

अगोदर साताऱ्यात; नंतर नवी मुंबईत मतदान करा, मंदा म्हात्रे यांचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2019 06:21 IST

लोकसभेच्या ठाणे आणि सातारा मतदारसंघातून भाजप-शिवसेना महायुतीचे राजन विचारे आणि माथाडी नेते नरेंद्र पाटील निवडणूक लढवत आहेत.

नवी मुंबई : लोकसभेच्या ठाणे आणि सातारा मतदारसंघातून भाजप-शिवसेना महायुतीचे राजन विचारे आणि माथाडी नेते नरेंद्र पाटील निवडणूक लढवत आहेत. या दोन्ही उमेदवारांना निवडून आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करायचे आहेत. अगोदर २३ एप्रिल रोजी साताºयात मतदान करा, त्यानंतर २९ एप्रिल रोजी नवी मुंबईत राजन विचारे यांना मतदान करा, असा अजब सल्ला बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी दिला आहे.कोपरखैरणे येथे आयोजित शिवसेना-भाजप युतीच्या सभेत म्हात्रे यांनी केलेल्या या वक्तव्याने एकच खळबळ उडाली असून, राष्ट्रवादी काँग्रेसने या प्रकरणी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे.ठाणे लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार राजन विचारे आणि सातारा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र पाटील यांच्या प्रचारासाठी रविवारी कोपरखैरणे येथे कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी बोलताना मंदा म्हात्रे यांचा तोल गेला. मात्र, चूक लक्षात येताच दोन ठिकाणी मतदान करण्याचा सल्ला यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही दिला होता, अशी पुष्टी जोडत त्यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, मंदा म्हात्रे यांच्या विधानाची गंभीर दखल घेत राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे ऐरोली विभागाचे अध्यक्ष राहुल शिंदे यांनी या प्रकरणी निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार केली असून पोलीस आयुक्तांना निवेदन दिले.>शरद पवारांचा होता सल्ला२०१४ च्या लोकसभा निवडणूक प्रचारात बोटाला लावलेली शाई पूसून सातारा आणि मुंबई अशा दोन्ही ठिकाणी मतदान करण्याचा सल्ला शरद पवार यांनी दिला होता.

टॅग्स :Maharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019Manda Mhatreमंदा म्हात्रेthane-pcठाणेsatara-pcसातारा