गेस्ट हाऊसवर छापा
By Admin | Updated: June 17, 2016 00:55 IST2016-06-17T00:55:41+5:302016-06-17T00:55:41+5:30
गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने एपीएमसीमधील गेस्ट हाऊसवर छापा टाकून कारवाई केली आहे. पोलिसांच्या छाप्यामध्ये त्याठिकाणी चालणारा वेश्याव्यवसाय उघडकीस आला
_ns.jpg)
गेस्ट हाऊसवर छापा
नवी मुंबई : गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने एपीएमसीमधील गेस्ट हाऊसवर छापा टाकून कारवाई केली आहे. पोलिसांच्या छाप्यामध्ये त्याठिकाणी चालणारा वेश्याव्यवसाय उघडकीस आला आहे. याप्रकरणी चौघांना अटक करण्यात आली असून चार महिलांची सुटका करण्यात आली आहे.
एपीएमसी येथील सागरकृपा गेस्ट हाऊसमध्ये वेश्याव्यवसाय चालत असल्याची तक्रार इंटरनॅशनल जस्टीज मिशन या संस्थेने गुन्हे शाखा पोलिसांकडे केली होती. त्यानुसार उपआयुक्त दिलीप सावंत, सहाय्यक आयुक्त नितीन कौसडीकर यांनी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाकडे तपास सोपवला होता. सदर तक्रारीच्या अनुषंगाने कक्षाचे वरिष्ठ निरीक्षक आनंद चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक संजय क्षीरसागर यांच्या पथकाने बुधवारी रात्री त्याठिकाणी छापा टाकला. येथील ग्राहकांना अनैतिक शरीर संबंधासाठी गेस्टहाऊस चालकांकडून महिला पुरवल्या जायच्या. अशा चार महिलांची गेस्ट हाऊसमधून पोलिसांनी सुटका केली आहे. तर गेस्टहाऊस चालक रत्नाकर शेट्टी, विजय यादव, रामकुमार यादव व कुलेश्वर यादव या चौघांना अटक केली आहे. त्यांच्याविरोधात एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)