ओरियन मॉलमध्ये स्वरांची धमाल, वर्षा उसगावकर यांचीही उपस्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2018 06:59 IST2018-05-08T06:59:37+5:302018-05-08T06:59:37+5:30

मराठी-हिंदी गाण्यांचा सदाबहार कार्यक्रम, सुप्रसिद्ध अभिनेत्री वर्षा उसगावकर यांची उपस्थिती यामुळे पनवेलकरांचा रविवार आनंदी व उत्साहात गेला.

The presence of vowels in the Orion Mall, the presence of Varsha Usgaonkar | ओरियन मॉलमध्ये स्वरांची धमाल, वर्षा उसगावकर यांचीही उपस्थिती

ओरियन मॉलमध्ये स्वरांची धमाल, वर्षा उसगावकर यांचीही उपस्थिती

कळंबोली : मराठी-हिंदी गाण्यांचा सदाबहार कार्यक्रम, सुप्रसिद्ध अभिनेत्री वर्षा उसगावकर यांची उपस्थिती यामुळे पनवेलकरांचा रविवार आनंदी व उत्साहात गेला. ओरियन मॉलच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त मॉल व्यवस्थापन व ‘लोकमत’च्या संयुक्त विद्यमाने आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमास शहरवासीयांनी प्रचंड गर्दी केली होती.
पनवेल शहरात दोन वर्षांपूर्वी मंगेश परुळेकर यांनी ओरियन मॉल सुरू केला. शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी असलेला हा मॉल गर्दीचे ठिकाण बनले आहे. वर्षभर येथे विविध कार्यक्र मांचे आयोजन करण्यात येते. परंतु कालच्या रविवारी आयोजित करण्यात आलेला कार्यक्र म आनंदाला उधाण आणणारा होता. ‘गौरव महाराष्ट्राचा’ या कार्यक्रमातील नचिकेत देसाई, धनश्री देशपांडे यांच्या गाण्याने रसिकांची मने जिंकली. मला वेड लागले प्रेमाचे... या गाण्याने कार्यक्र माची सुरुवात झाली. या गाण्याला उपस्थितांची वाहवा मिळाली. तर चोरीचा मामला मामाही थांबला... या बोलावर वर्षा उसगावकरांनी सुद्धा नृत्य करीत जुन्या आठवणींना उजाळा दिला. सोबतच चिकणी चमेली, इतिसी हसी इतिसी खुशी इत्तासा तुकडा चाँद का, नदीच्या पल्याड आईचा डोंगर या गीताने वातावरण भक्तिमय केले. काळी माती, निळं पाणी, हिरवं शिवार या गीतावर ओरियन मॉल संगीतमय झाले. नीतिक्स क्रि एशनने हा कार्यक्र म सादर केला. वर्षा उसगावकर यांच्याशी मीनल जोगळेकर यांनी संवाद साधत अनेक गोष्टींचा उलगडा केला.
चित्रपट आणि मालिकांमध्ये बारा तासांपेक्षा जास्त काम करावे लागते, असे उसगावकरांनी सांगितले. त्याचबरोबर कोकणी भाषेत ‘जावई नंबर वन’ हा नवीन चित्रपट लवकरच प्रदर्शित होत असल्याची माहिती त्यांनी दिली. ‘लोकमत’बद्दल सुद्धा वर्षा उसगावकर भरभरून बोलल्या. हे वृत्तपत्र घराघरात वाचले जाते, आपण ‘लोकमत’चे वाचक असल्याचे सांगण्यास त्या विसरल्या नाहीत. या वेळी मंगेश परुळेकर, मानसी परुळेकर, दिलीप करेलिया, नैना करेलिया, सिमरन मोटर्सचे मालक मीना कोहली, उपाध्यक्ष अरविंद सिंग आदी उपस्थित होते.

कुसुम ससाणे ठरल्या लकी
ओरियन मॉलच्या वतीने ग्राहकांकरिता बम्पर लॉटरी धमाका ठेवण्यात आला होता. एकूण पंधरा ग्राहकांची निवड करण्यात आली होती. त्यापैकी एक चिठ्ठी वर्षा उसगावकर यांच्या हस्ते काढण्यात आली. करंजाडे येथील कुसुम ससाणे लकी ठरल्या आणि त्यांना मारुती सुझुकी कार बक्षीस मिळाली.

Web Title: The presence of vowels in the Orion Mall, the presence of Varsha Usgaonkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.