शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
2
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
3
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
4
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
5
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 
6
मुलुंडमध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून तणाव; उद्धव सेना- भाजप कार्यकर्ते आमने-सामने
7
प्रचारादरम्यान कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला, हार घालण्यासाठी आलेल्या तरुणाने लगावली थप्पड!
8
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
9
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
10
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
11
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
12
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
13
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
14
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
15
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
16
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
17
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
18
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
19
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
20
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!

रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य; १.४८ लाख कोटींची तरतूद!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 02, 2018 5:58 AM

रेल्वे प्रवास व मालवाहतुकीच्या दरात यंदा कोणतीही भाडेवाढ नाही. अर्थसंकल्पात रेल्वेसाठी १.४८ लाख कोटींची तरतूद असून, रेल्वे वाहतुकीच्या तसेच प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य दिले आहे. देशातील ४२६७ मानवरहित रेल्वे क्रॉसिंग बंद केली जाणार असून, मार्गांची दुरूस्ती व देखरेख याकडे विशेष लक्ष पुरवले जाईल.

- सुरेश भटेवरानवी दिल्ली : रेल्वे प्रवास व मालवाहतुकीच्या दरात यंदा कोणतीही भाडेवाढ नाही. अर्थसंकल्पात रेल्वेसाठी १.४८ लाख कोटींची तरतूद असून, रेल्वे वाहतुकीच्या तसेच प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य दिले आहे. देशातील ४२६७ मानवरहित रेल्वे क्रॉसिंग बंद केली जाणार असून, मार्गांची दुरूस्ती व देखरेख याकडे विशेष लक्ष पुरवले जाईल.प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी ट्रेनच्या प्रत्येक बोगीत सीसीटीव्ही कॅमेरे असतील आणि प्लॅटफॉर्मवरही त्यांची संख्या वाढवली जाईल. सर्व ट्रेन्समधे व्हाय फाय सुविधा असेल. सर्व नॅरोगेज लाइन्सचे ब्रॉडगेजमधे रूपांतर व रेल्वेव्दारा मालवाहतूक अधिक वेगागे करण्याची ग्वाही अर्थसंकल्पात आहे.रेल्वेसाठी नवे काय?ज्येष्ठ नागरिक व रूग्णांची गरज लक्षात घेत रोज २५ हजारांहून अधिक लोकांच्या वर्दळीच्या सर्व स्थानकांवर एस्कलेटर्स बसवण्यात येतील. एकूण ११ हजार ट्रेन्सच्या बोगीत व प्लॅटफॉर्म्सवर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यासाठी ३ हजार कोटी रूपये खर्च अपेक्षित आहे. सर्व शहरी रेल्वे स्थानकांवर साधारणत: ३ हजार एस्केलेटर्स व १ हजार लिफ्टस लावण्याचा संकल्प आहे.कर्नाटकात लवकरच विधानसभेची निवडणूक आहे, ही बाब लक्षात घेता बंगळुरूत उपनगरी लोकल वाहतूक सेवेत १६0 किलोमीटर्स अंतराची भर घालण्यासाठी १७ हजार कोटींची तरतूद आहे. बुलेट ट्रेन्स व हायस्पीड ट्रेन्सचे प्रकल्प लक्षात घेता तरूणांना या नव्या तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देण्यासाठी बडोद्यात रेल्वे इन्स्टिट्युट उभारली जाईल. या इन्स्टिट्युटमधे ३ हजार विद्यार्थ्यांना प्रवेश मिळेल. त्याचा पूर्ण खर्च रेल्वे करील.36000किलोमीटर्सचे भारतात नवे लोहमार्ग तयार होणार आहेत. १८ हजार किलोमीटर्स लोहमार्गांचे दुहेरीकरण (डबलिंग) व ४ हजार किलोमीटर्स लोहमार्गांचे त्रिपदरी व चौपदरीकरण करण्याचा संकल्प आहे.4000किलोमीटर्स देशात लोहमार्गाच्या विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. रेल्वेने आपले उत्पन्न वाढवण्यासाठी ताब्यातल्या रिकाम्या जमिनींचा व्यापारी पद्धतीने वापर करण्याचे ठरवले आहे.मुंबईतील रेल्वेच्या विस्तारासाठीभरीव निधीमुंबईच्या उपनगरी लोकल वाहतुकीत ९0 किलोमीटर्स अंतराचा विस्तार करण्यासाठी ११ हजार कोटींची तरतूद आहे. यात रेल्वे मार्गाचे दुपदरीकरण केले जाणार आहे. उपनगरीय रेल्वेचा १५० किलोमीटरने विस्तार केला जाणार आहे. यासाठी ४० हजार कोटींची तरतूद केली आहे. - 

टॅग्स :Budget 2018अर्थसंकल्प २०१८Budgetअर्थसंकल्प