भरोशाच्या प्रभागांत शेकापला धोका
By Admin | Updated: May 29, 2017 06:38 IST2017-05-29T06:38:15+5:302017-05-29T06:38:15+5:30
शेकापक्षाच्या पराभवाला अनेक गोष्टी कारणीभूत आहेत. मात्र जे प्रभाग भरोशाचे होते तिथेच धोका बसला त्यामुळे संख्याबळ

भरोशाच्या प्रभागांत शेकापला धोका
अरु णकुमार मेहत्रे / लोकमत न्यूज नेटवर्क
कळंबोली : शेकापक्षाच्या पराभवाला अनेक गोष्टी कारणीभूत आहेत. मात्र जे प्रभाग भरोशाचे होते तिथेच धोका बसला त्यामुळे संख्याबळ घसरले आणि अपेक्षित यश मिळाले नाही. तसेच लाल बावट्याचे तगडे उमेदवार पराभूत झाल्याने मोठा धक्का बसला.
पनवेल महानगरपालिका निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाला बऱ्याच गोष्टी अनुकूल होत्या. प्रभाग रचनेपासून ते प्रचाराकरिता मिळालेला वेळ सोबत तीन पक्षांची आघाडी या सर्व गोष्टी जमेचा होत्या. त्या तुलनेत भाजपासाठी प्रभाग सुध्दा प्रतिकूल पडले. हक्काचे मतदार या प्रभागातून त्या प्रभागात गेले. त्यातच पक्षाकडे संदीप पाटील, सुनील बहिरा, अजय कांडपिळे, शिवाजी थोरवे, मुकुंद म्हात्रे, के.के.म्हात्रे, अशोक गिरमकर, उषा अडसुळे हे मातब्बर उमेदवार होते. विशेष करून माजी नगराध्यक्ष संदीप पाटील पाचव्यांदा नगरसेवकपदाची निवडणूक लढवीत होते. त्यांच्याकडे असलेला अनुभव, वहाळच्या पाटील घराण्याची ताकद त्याचबरोबर साम दंड भेद या नीतीत ते पारंगत होते. जोडीला राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष सुनील घरत आणि माजी नगरसेवक अजय भोईर हे तगडे उमेदवार होते. त्यामुळे प्रभाग क्र मांक १७ आघाडीच्या बेरजेत होता. चारही उमेदवार निवडून येतील याबाबत सर्व नेते ठाम होते. परंतु या ठिकाणी भाजपाच्या अॅड.मनोज भुजबळ यांनी आपले संपूर्ण पॅनल निवडून आणीत मोठा धक्का शेकाप आघाडीला दिला. प्रभाग क्र मांक १९ मध्ये बहिरा दाम्पत्य आणि अजय कांडपिळे या तगड्या उमेदवारांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्यात आले होते. सुनील बहिरा यांची या परिसरात असलेली पकड यामुळे संपूर्ण पॅनेल निवडून येणार असे शेकापने गृहीत धरले होते. या ठिकाणी पराभव झाला त्यामुळे गणित चुकले. खांदा वसाहतीचा समावेश असलेल्या प्रभाग १५मध्ये शिवाजी थोरवे यांच्यासह आणखी एक उमेदवार निवडून येईल असा अंदाज शेकापने बांधला होता. परंतु या ठिकाणी संजय भोपींच्या टीमने थोरवेंच्या टीमचा पराभव केला. या प्रभागानेही शेकापला काही प्रमाणात निराश केले. या व्यतिरिक्त प्रभाग क्र मांक १२ मध्ये के.के. म्हात्रे यांच्यासारखा तुल्यबळ उमेदवार होता. त्यांच्याबरोबर येथूनच सखाराम पाटील यांची पत्नी ललिता यांना उमेदवारी देण्यात आली होती. या दोन नेत्यांचा प्रभाव येथे असल्याने १२ आपल्याकडे येईल असा विश्वास शेकापला होता. येथेही मतदारांनी तो फोल ठरवला. प्रभाग क्रमांक चारमध्ये गुरुनाथ गायकर आणि सहामध्ये अशोक गिरमकर व उषा अडसुळे यांचा विजय पक्षाने गृहीत धरला होता.