खाडी पुलावरून महिलेचा आत्महत्येचा, मच्छिमारांनी वाचवले प्राण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2018 23:21 IST2018-11-11T23:18:37+5:302018-11-11T23:21:10+5:30
नवी मुंबई - कोपर खैरणे येथे राहणाऱ्या 45 वर्षीय महिलेने वाशी खाडीपूलवरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. रविवारी दुपारी ...

खाडी पुलावरून महिलेचा आत्महत्येचा, मच्छिमारांनी वाचवले प्राण
नवी मुंबई - कोपर खैरणे येथे राहणाऱ्या 45 वर्षीय महिलेने वाशी खाडीपूलवरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. रविवारी दुपारी हा प्रकार घडला. यावेळी पुलाखाली खाडीमध्ये मासेमारी करणाऱ्या वाशी गावातील राजू जोशी, पुंडलिक भगत, दत्ता भोईर आदी मच्छिमारांनी हा प्रकार पाहिला. त्यांनी तात्काळ घटनास्थळी बोट नेवून पाण्यात बुडत असलेल्या महिलेला बोटीत खेचून तिचे प्राण वाचवले.
दरम्यान, चौकशीत कौटुंबिक वादातून त्यांनी हा प्रकार केल्याचे सांगितले. त्यानुसार सदर महिलेला कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आले आहे.