अपघातातील तरुणांचे वाहतूक पोलिसांनी वाचवले प्राण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2017 02:48 IST2017-10-22T02:47:38+5:302017-10-22T02:48:04+5:30

पनवेल शहरातील उड्डाणपुलाखाली शुक्रवारी रिक्षा आणि दुचाकीत झालेल्या अपघातात दुचाकीवरील दोन्ही युवक जखमी झाले होते.

Pran survived by traffic police | अपघातातील तरुणांचे वाहतूक पोलिसांनी वाचवले प्राण

अपघातातील तरुणांचे वाहतूक पोलिसांनी वाचवले प्राण


पनवेल : पनवेल शहरातील उड्डाणपुलाखाली शुक्रवारी रिक्षा आणि दुचाकीत झालेल्या अपघातात दुचाकीवरील दोन्ही युवक जखमी झाले होते. वाहतूक पोलिसांनी दाखविलेल्या प्रासंगिक प्रयत्नांमुळे या तरुणांना तत्काळ रुग्णालयात पाठविण्यात आल्याने त्यांचे प्राण वाचले.
पनवेल येथील नानासाहेब धर्माधिकारी उड्डाणपुलाखाली रिक्षाने (एमएच ०६ बीव्ही ०७०) शुक्रवारी सकाळी ८च्या सुमारास एका दुचाकीला धडक दिली. यात दुचाकीवरील सूरज बिंगेवार यांचा पाय फ्रॅक्चर झाला, तर कल्पेश तांबे यांना मार लागला होता. तर रिक्षाचालकाला किरकोळ मार लागला होता. या वेळी नागरिकांनी वाहतूक पोलिसांना फोन करून कळविले. पोलिसांनी तत्काळ येथे येऊन या दोन्ही तरुणांना रिक्षात घालून एमजीएम कामोठे या ठिकाणी उपचारासाठी दाखल केले. वाहतूक पोलीस हवालदार एस. सी. पाटील व पोलीस नाईक पी. एन. मोकल यांनी दाखविलेल्या माणुसकीमुळे या दोघांचे जीव वाचले आहेत. या अपघातात दोन्ही वाहनांचे नुकसान झाले आहे.

Web Title: Pran survived by traffic police