महापारेषणच्या कामामुळे ऐरोलीमध्ये रविवारी वीजपुरवठा राहणार बंद
By नारायण जाधव | Updated: October 26, 2023 17:21 IST2023-10-26T17:20:50+5:302023-10-26T17:21:02+5:30
वीज पुरवठा बंद राहणाऱ्या ठिकाणच्या नागरिकांनी याची नोंद घेऊन योग्य त्या उपाययोजना कराव्यात असे आवाहन महावितरण कंपनीकडून करण्यात येत आहे.

महापारेषणच्या कामामुळे ऐरोलीमध्ये रविवारी वीजपुरवठा राहणार बंद
नवी मुंबई: महापारेषण कंपनीच्या ४०० केव्ही कळवा-खारेगाव लाईनची उंची वाढविण्याचे काम रविवारी करण्यात येणार आहे. हे काम अनेक महिन्यांपासून प्रलंबित आहे. त्यामुळे ऐरोली-काटई महामार्गाचे काम ऐरोली मधील युरो स्कूल समोरील फ्लयओव्हरचे काम अपूर्ण आहे. सदर कामामुळे या ठिकाणी वाहतूककोंडी होत असते. त्यामुळे वरील काम करण्याचे महापारेषणने दिनांक २९/१०/२३ रोजी प्रस्तावित केले आहे.
सदर काम, पहाटे ५.०० वा . पासून सुरु होईल व दुपारी २. ०० वाजेपर्यंत संपेल. त्यामुळे या कालावधीत ऐरोली गाव, ऐरोली भक्ती पार्क, ऐरोली नाका, साईनाथवाडी , नेव्हागार्डन ,शिव कॉलनी , समतानगर, या ठिकाणचा वीजपुरवठा बंद राहणार आहे. ऐरोली मधील इतर ठिकाणचा वीज पुरवठा पर्यायी व्यवस्था करून चालू केला जाईल असे कार्यकारी अभियंता मोहोड यांनी सांगितले आहे. तरी वीज पुरवठा बंद राहणाऱ्या ठिकाणच्या नागरिकांनी याची नोंद घेऊन योग्य त्या उपाययोजना कराव्यात असे आवाहन महावितरण कंपनीकडून करण्यात येत आहे.