उष्णतेच्या लाटेमुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2019 02:36 AM2019-05-08T02:36:28+5:302019-05-08T02:37:14+5:30

नवी मुंबई, पनवेल, उरण परिसरामध्येही उष्णतेच्या लाटेमुळे नागरिक हैराण होऊ लागले आहेत. वाढत्या उकाड्यामुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता असून प्रत्येक नागरिकाने आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन आपत्कालीन विभागाने केले आहे.

 The possibility of a severe impact on health due to heat waves | उष्णतेच्या लाटेमुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता

उष्णतेच्या लाटेमुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता

googlenewsNext

नवी मुंबई - नवी मुंबई, पनवेल, उरण परिसरामध्येही उष्णतेच्या लाटेमुळे नागरिक हैराण होऊ लागले आहेत. वाढत्या उकाड्यामुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता असून प्रत्येक नागरिकाने आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन आपत्कालीन विभागाने केले आहे.
शहरामधील तापमान सरासरी ३३ डिग्रीपर्यंत गेले आहे. पुढील एक महिन्यामध्ये त्यामध्ये अजून वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली
आहे.

इमारतींची वाढती संख्या व रोडचेही झालेले काँक्रीटीकरण यामुळे तापमानामध्ये भर पडत आहे. आयटी पार्कसह इतर इमारतींना लावण्यात येणारे काचेचे आवरण यामुळेही तापमान वाढत आहे.

उरण परिसरामध्ये कंटेनर यार्डचा परिणाम उष्णता वाढण्यावर होत आहे. दिवसेंदिवस वाढत चाललेल्या तापमानामुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

कष्टाची कामे करणारे माथाडी कामगार,घरोघरी जाऊन मार्केटिंगचे काम करणारे कर्मचारी व रोडवर उन्हात उभे राहून नोकरी, व्यवसाय करणाऱ्यांना उन्हाचा त्रास होत आहे. अनेकांना उन्हामुळे चक्कर येण्याच्या घटनाही घडत आहेत. त्वचेचे विकारही होऊ लागले आहेत. उष्माघाताचा त्रास होण्याची शक्यता असल्यामुळे प्रत्येक नागरिकाने स्वत:ची काळजी घ्यावी अशा सूचना महापालिका प्रशासनाने केल्या आहेत.
उकाड्यापासून वाचण्यासाठी नागरिक उद्यान, मॉल व इतर ठिकाणांचा आश्रय घेत असल्याचे चित्र शहरामध्ये दिसू लागले आहे. दुपारी मॉलमध्ये क्षणभर वातानुकूलित यंत्रणेमध्ये घालविण्यासाठी जाणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. रोडवरील रसवंतीगृहेही नागरिकांना दिलासादायक वाटू लागली आहेत. पुढील एक महिना उष्णतेचा त्रास होणार असून या काळात विशेष काळजी घ्यावी लागणार आहे.

उष्णतेपासून बचाव करण्यासाठी काय करावे?
तहान लागली नसली तरी जास्त पाणी प्यावे
घराबाहेर जाताना गॉगल्स, छत्री, टोपी, बूट व चपलांचा वापर करण्यात यावा
शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत असल्यास ओआरएस, लस्सी, लिंबू पाणी, ताक याचा नियमित वापर करावा
पहाटेच्या व सायंकाळच्या वेळेत जास्तीत जास्त कामाचा निपटारा करावा

उष्माघातापासून वाचण्यासाठी पुढील गोष्टी टाळाव्या
दुपारी १२ ते ३.३० या कालावधीमध्ये उन्हात बाहेर जाणे टाळावे
गडद, घट्ट व जाड कपडे
घालण्याचे टाळावे
बाहेर तापमान अधिक असल्यास
शारीरिक श्रमाची कामे टाळावीत,
लहान मुलांना बंद असलेल्या व पार्क केलेल्या वाहनात ठेवू नये

Web Title:  The possibility of a severe impact on health due to heat waves

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.