शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
2
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
3
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
4
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
5
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
6
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
7
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
8
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
9
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
10
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
11
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
12
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
13
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
14
पुन्हा इराण युद्धासारखं संकट आलं तरी होणार नाही तेल-गॅसची टंचाई; सरकारचा 'मास्टर प्लॅन', सुरू केली मोठी तयारी
15
IPL 2026: विराट कोहली करणार रोहित शर्माची बरोबरी? RCB vs LSG सामन्यात मिळणार सुवर्णसंधी
16
भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी
17
ट्रम्प यांना बाजूला सारले, युरोपीयन NATO देशांची वेगळी चूल; अमेरिकेला एकटे पाडायची तयारी
18
Bhagwant Mann : "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
19
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
20
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
Daily Top 2Weekly Top 5

महापालिका मतदार याद्यांमध्ये महाघोळ

By admin | Updated: March 16, 2017 03:01 IST

पनवेल महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार याद्या जाहीर करण्यात आल्या आहेत. मात्र त्यामध्ये मोठ्या प्रमाणात घोळ असल्याचे उघड झाले आहे.

कळंबोली : पनवेल महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार याद्या जाहीर करण्यात आल्या आहेत. मात्र त्यामध्ये मोठ्या प्रमाणात घोळ असल्याचे उघड झाले आहे. याविरोधात भारतीय जनता पक्षाने दंड थोपटले आहेत. नवीन पनवेलमध्ये जे उमेदवार आहेत त्यांची नावे गायब झाली असल्याची तक्र ार महापालिका प्रशासनाकडे करण्यात आली आहे. अनेकांचे नावे दुसऱ्या प्रभागात गेल्याने तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाकडून गुरुवारी उपोषणाचे हत्यार उपसले आहे.पनवेल महानगरपालिका स्थापन झाल्यानंतर नव्याने प्रभाग रचना झाली आहे. प्रभागाचे प्रारूप जाहीर झाले आहेत त्याचबरोबर बदललेल्या प्रभाग रचनेनुसार मतदार याद्या नव्याने तयार करण्यात आल्या. मतदार याद्या नागरिकांच्या हरकती व सूचनांसाठी प्रसिध्द करण्यात आल्या आहेत. मतदार याद्या जाहीर झाल्यानंतर राजकीय पक्ष आणि इच्छुक उमेदवारांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. काहींचे हक्काचे मतदान दुसऱ्या प्रभागात गेले आहेत. नवीन पनवेलमधील अनेकांचे नावे पनवेल आणि खांदा वसाहतीत गेली आहेत. याविरोधात भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना आक्षेप नोंदवला आहे. प्रभाग क्र मांक १७ मधील काही मतदारांची नावे प्रभाग २0मध्ये गेली आहेत. पनवेल शहर, तक्का, नवनाथनगर झोपडपट्टीत अनोळखी नावे आली असल्याचा आरोप अ‍ॅड. मनोज भुजबळ यांनी केला आहे. प्रभाग १४ मध्ये समाविष्ट करण्यात आलेले सेक्टरमधील मतदार यादीतून गायब झाले आहेत. याबाबत आम्ही अगोदरच उपायुक्त मंगेश चितळे, भगवान खाडे आणि गणेश साळवी यांना माहिती दिली होती. त्यावेळी त्यांनी प्रारूप यादीमध्ये दुरुस्ती करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु त्यामध्ये कोणताही बदल करण्यात आला नसल्याचे भुजबळ यांनी सांगितले.