शहरं
Join us  
Trending Stories
1
टेस्लामध्ये मोठा पेच! पॅकेजवरून वाद, एलन मस्क कंपनी सोडण्याची शक्यता; अध्यक्षांचा गंभीर इशारा...
2
एकनाथ खडसेंच्या जळगावातील बंगल्यात चोरी; किती मुद्देमाल चोरून नेला?
3
मोठी अपडेट: श्रेयस अय्यर ड्रेसिंग रुममध्येच बेशुद्ध पडलेला; वैद्यकीय पथकाने लागलीच धोका ओळखला, नाहीतर...
4
"तेच रडणे, तीच मळमळ, त्याच उलट्या, त्याच फुशारक्या...", भाजपाने उद्धव ठाकरेंना डिवचलं
5
कॉफीसाठी जगभरात प्रसिद्ध असलेला 'हा' देश मोठ्या संकटात! यावर्षीच्या सगळ्यात भयंकर विनाशाला सामोरा जाणार
6
पेटीएम, जीपे, फोनपेवरील ऑटो पे कसे बंद कराल? आपोआप जातायत सबस्क्रीप्शन, पेमेंटचे पैसे... 
7
CCTV फुटेजमध्ये भलत्याच ठिकाणी दिसला आरोपी अन्...; अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात ट्विस्टवर ट्विस्ट
8
Aadhaar Card New Rules 1st Nov: महत्त्वाची बातमी! १ नोव्हेंबरपासून बदलणार आधार कार्डाशी निगडीत ३ मोठे नियम, जाणून घ्या
9
शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स ८४,८८० च्या पार; निफ्टीही वधारला, 'या' प्रमुख स्टॉक्समध्ये तेजी
10
वनप्लस १५ येतोय...! पण १४ क्रमांक का वगळला? चिनी संस्कृतीत असे काय आहे...
11
शंकर महाराज प्रकट दिन: म्हणा अकरा कवनांचे स्तोत्र, विजयी होईल सर्वत्र; कामना होतील पूर्ण
12
Bank Holidays November 2025: नोव्हेंबरमध्ये किती दिवस बँका राहणार बंद? पाहा RBI ची हॉलिडे लिस्ट, पटापट आटपा काम
13
"महाराष्ट्रात भाजप कोणाच्याही कुबड्यांवर चालत नाही; सत्तेमुळे तुम्ही समाधानी असाल, पण मी नाही": शाह
14
१०० वर्षांनी महालक्ष्मीसह ४ राजयोग: ७ राशींना सुबत्ता, कल्याण; बक्कळ लाभ, यशाचा मंगलमय काळ!
15
Tulasi Vivah 2025: विष्णू हे लक्ष्मीपती असूनही दरवर्षी तुळशीशी का लावला जातो विवाह?
16
LIC ची ‘ही’ स्कीम गुंतवणूकदारांना बनवेल कोट्यधीश!; ४ वर्षापर्यंत भरा प्रीमिअम, मिळतील १ कोटी
17
"मी तुला कच्च खाऊन टाकेन"; बायकोने नवऱ्याला गर्लफ्रेंडसोबत रंगेहाथ पकडलं, चपलेने धू-धू धुतलं
18
आजचे राशीभविष्य, २८ ऑक्टोबर २०२५: ‘मौनं सर्वार्थ साधनम्’, येणी वसूल होतील; सरकारी लाभ
19
चिनी हँडलर, टेलिग्राम ट्रॅप, लाखोंची लूट... ४७ लाखांच्या फसवणुकीचा पर्दाफाश, तिघांना अटक
20
तुमचे अधिकारी वृत्तपत्र वाचत नाहीत का? देशाची प्रतिमा मलिन होतेय; भटक्या कुत्र्यांवरून भडकले कोर्ट

पक्षांतराच्या राजकारणाचा नवी मुंबईच्या विकासावर परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2019 03:57 IST

माजी मंत्री गणेश नाईक समर्थकांच्या पक्षांतराचा परिणाम शहराच्या विकासावर होऊ लागला आहे.

नवी मुंबई : माजी मंत्री गणेश नाईक समर्थकांच्या पक्षांतराचा परिणाम शहराच्या विकासावर होऊ लागला आहे. सलग तीन आठवडे स्थायी समितीची सभा झालेली नाही. मे नंतर परिवहन समितीची बैठकही होऊ शकली नसून, नोव्हेंबरपर्यंत परिवहनचे कामकाज ठप्प राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.निवडणुका जवळ आल्या की, महानगरपालिकेच्या स्थायी समिती व सर्वसाधारण सभेमध्ये जास्तीत जास्त विकासकामांना मंजुरी देण्याची स्पर्धा सुरू होते. नवी मुंबईमध्येही यापूर्वी सर्वच निवडणुकांच्या वेळी हे चित्र पाहावयास मिळत होते; परंतु विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी मंत्री गणेश नाईक यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरू झाली आहे. ऐरोलीचे आमदार संदीप नाईक माजी महापौरांसह माजी नगरसेवकांची फौज घेऊन प्रत्यक्ष भाजपात गेले आहेत. गणेश नाईक व महापालिकेमधील नगरसेवकही लवकरच पक्षांतर करण्याची चर्चा सुरू आहे.या सर्व प्रक्रियेचा परिणाम विकासकामांवर होऊ लागला आहे. नाईक समर्थकांची २९ जुलैला महापौर बंगल्यावर मिटिंग झाल्यानंतर पक्षांतराच्या हालचालींना वेग आला, तेव्हापासून स्थायी समितीची एकही सभा झालेली नाही. या कालावधीमध्ये तीन सभा होणे अपेक्षित होते. गणेशोत्सवानंतर विधानसभेसाठीची आचारसंहिता लागणार असून, स्थायी समितीच्या सभा न झाल्यास अनेक प्रस्ताव रखडण्याची शक्यता आहे. किंवा शेवटच्या काही आठवड्यांमध्ये चर्चा न होताच कोट्यवधी रुपयांच्या प्रस्तावांवर पुरेशी चर्चा न होताच त्यांना मंजुरी दिली जाण्याची शक्यता आहे.नवी मुंबई महानगरपालिका परिवहन समितीच्या कामकाजावरही परिणाम झाला आहे. मे महिन्यामध्ये सभा झाली होती. या नंतर परिवहनमधील सहा जण निवृत्त झाले आहेत. त्यांच्या जागेवर नवीन सदस्य निवडताना विरोधी पक्षांना डावलण्यात आले. फक्त राष्ट्रवादी काँगे्रसच्याच सदस्यांची निवड करण्यात आली. या निवडीला शिवसेनेने शासनाकडे आव्हान दिले. शासनाने नियमबाह्य निवडीला स्थगिती दिली आहे. यामुळे परिवहन समितीची सभा झालेली नाही. आॅगस्टमध्ये सभा झाली नाही तर विधानसभेची निवडणूक होईपर्यंत कामकाज ठप्प राहणार आहे. नोव्हेंबरनंतरच कामकाज होऊ शकणार आहे, यामुळे परिवहनशी संबंधित धोरणात्मक निर्णय घेता येणार नाहीत.केंद्र शासनाने नवी मुंबईसाठी १०० इलेक्ट्रिकल बसेस मंजूर केल्या आहेत. या बसेस महापालिकेच्या ताफ्यात आल्यानंतर त्याचा वापर करण्यासाठी महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागणार आहेत.महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी या विषयी माहिती घेण्यासाठी संपर्क साधला असता स्थायी समितीसाठी विषय नसल्यामुळे मिटिंग झाली नसल्याचे सांगण्यात आले. सर्वसाधारण सभा २० आॅगस्टला होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले; पण स्थायी समितीची सभा नक्की कधी होणार या विषयी काहीही माहिती देण्यात आलेली नाही. स्थायी समिती सभापती नवीन गवते यांच्याशी संपर्क साधला; परंतु संपर्क होऊ शकला नाही.परिवहन समितीची शेवटची सभा मे महिन्यामध्ये झाली आहे. त्यानंतर एकही सभा होऊ शकली नाही. आॅगस्टमध्ये बैठक झाली नाही तर नोव्हेंबरपर्यंत सभा घेता येणार नाही. सभा आयोजित करण्याची मागणी आम्ही प्रशासनाकडे केली आहे; परंतु प्रशासनाने अद्याप काहीही कार्यवाही केलेली नाही.- सुधीर पवार, परिवहन समिती सदस्य, काँगे्रसविकासकामे पूर्ण करण्याचे आव्हाननवी मुंबई महानगरपालिकेने २०१९-२० या आर्थिक वर्षासाठी ४०२० कोटी रुपयांचा अर्थसंकल्प तयार केला आहे. लोकसभा निवडणुकीमुळे आर्थिक वर्षातील दोन महिने कामकाज होऊ शकले नाही. पक्षांतराच्या गोंधळामुळे एक महिना फुकट गेला असून, पुढील दोन महिने विधानसभा निवडणुकीमुळे कामकाज होऊ शकणार नाही. मार्चमध्ये पुन्हा महापालिका निवडणुकीची धामधूम सुरू होणार असल्यामुळे अर्थसंकल्पातील नियोजित कामे करताना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईNavi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिकाGanesh Naikगणेश नाईक