भाताण बोगद्यात पोलिसांच्या वाहनांचा अपघात; पोलीस कर्मचारी जखमी

By नामदेव मोरे | Updated: June 18, 2025 13:40 IST2025-06-18T13:40:01+5:302025-06-18T13:40:58+5:30

मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर सकाळी एक अपघात झाला होता. त्यावेळी मदतीचे काम सुरू होते. याच दरम्यान पोलिसांचा ताफा आरोपी बांगलादेशी नागरिकांना घेऊन पुणे येथे जात होते.

Police vehicle accident in Bhatan tunnel Police personnel injured | भाताण बोगद्यात पोलिसांच्या वाहनांचा अपघात; पोलीस कर्मचारी जखमी

भाताण बोगद्यात पोलिसांच्या वाहनांचा अपघात; पोलीस कर्मचारी जखमी

मयुर तांबडे/नवीन पनवेल : भाताण बोगद्यात 18 जून रोजी सकाळी पोलिसांच्या वाहनांचा अपघात झाला असून यात काही पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. त्यांच्यावर एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर सकाळी एक अपघात झाला होता. त्यावेळी मदतीचे काम सुरू होते. याच दरम्यान पोलिसांचा ताफा आरोपी बांगलादेशी नागरिकांना घेऊन पुणे येथे जात होते. या पोलिसांच्या ताफ्यातील वाहनाने ब्रेक दाबल्याने एका पाठोपाठ एक तीन ते चार गाड्या एकमेकांवर धडकल्या आणि मोठा अपघात झाला.

या अपघातात दहा ते पंधरा पोलीस जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे तर बांगलादेशी नागरिक देखील जखमी झाले आहेत. त्यांच्यावर एमजीएम रुग्णालय कामोठे येथे उपचार सुरू आहेत. या अपघाताची माहिती मिळताच पोलीस आयुक्त, पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 यांच्यासह अनेक पोलीस अधिकारी घटनास्थळी तसेच एमजीएम रुग्णालय कामोठे येथे दाखल झाले होते.

Web Title: Police vehicle accident in Bhatan tunnel Police personnel injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात