सिडकोच्या घरांना पोलिसांचा प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2020 00:16 IST2020-08-03T00:15:57+5:302020-08-03T00:16:23+5:30
सहा दिवसांत ८५0 अर्ज: १५ सप्टेंबर रोजी संगणकीय सोडत, ९० हजार घरांचे काम सुरू

सिडकोच्या घरांना पोलिसांचा प्रतिसाद
नवी मुंबई : सिडकोने खास पोलिसांसाठी सुरू केलेल्या गृहयोजनेला पोलिसांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. मागील सहा दिवसांत या गृहप्रकल्पासाठी जवळपास ८५0 पोलिसांनी अर्ज केले आहेत. या योजनेतील घरांसाठी १५ सप्टेंबर रोजी संगणकीय सोडत काढली जाणार आहे. ‘मागणी तसा पुरवठा’ या तत्त्वावर घरांची निर्मित्ती करण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. त्यानुसार, विविध घटकांसाठी २ लाख १0 हजार घरे बांधण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यातील ९0 हजार घरांचे कामही सुरू करण्यात आले आहे.
शहरातील ट्रक टर्मिनल्स, रेल्वे स्थानकांचा फोर्ट कोअर एरिया आदी भागात ही घरे प्रस्तावित आहेत. त्यापैकी अनेक ठिकाणी गृहप्रकल्पांचे कामही सुरू करण्यात आले आहे. तत्पूर्वी २0१८ मध्ये सिडकोच्या माध्यमातून काढण्यात आलेल्या पंधरा हजार घरांच्या गृहप्रकल्पातील यशस्वी अर्जदारांना पुढील दीड-दोन महिन्यांत घरांचे प्रत्यक्ष वाटप करण्याची तयारी सिडकोने सुरू केली आहे.
विशेष म्हणजे, याच गृहप्रकल्पात ४,४६६ घरे खास पोलिसांसाठी राखीव ठेवण्यात आली आहे. या घरांसाठी २८ जुलैपासून नोंदणी सुरू करण्यात आली आहे. मागील सहा दिवसांत जवळपास साडेआठशे पोलिसांनी नोंदणी केल्याचे समजते. सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या योजनेचा आॅनलाइन शुभारंभ केला. त्यानंतर, २८ जुलैपासून घरासाठी प्रत्यक्ष नोंदणीही सुरू करण्यात आली आहे. २९ आॅगस्टपर्यंत आॅनलाइन अर्ज स्वीकारले जाणार आहेत.
५ नोडचे काम प्रगतिपथावर
च्तळोजा, खारघर, कळंबोली, घणसोली आणि द्रोणागिरी या पाच नोडमध्ये महागृहप्रकल्पाचे काम प्रगतिपथावर आहे.४,४६६ घरे पोलीस कर्मचाऱ्यांसाठी असणार आहेत. यापैकी १,0५७ सदनिका आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी तर उर्वरित ३४0९ सदनिका अल्प उत्पन्न गटासाठी असणार आहे. मुंबई महानगर क्षेत्रात सेवा बजावणाºया पोलीस कर्मचाऱ्यांनाच या योजनेचा लाभ घेता येणार आहे.