शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

पोलिसांकडून चार कोटींचा मुद्देमाल परत, १९१ गुन्ह्यांमधील ऐवज

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2019 04:13 IST

शहरातील विविध गुन्ह्यांची उकल करून पोलिसांनी चार कोटींचा मुद्देमाल जप्त केला आहे. हा मुद्देमाल पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांच्या हस्ते संबंधित तक्रारदारांना परत करण्यात आला.

नवी मुंबई  - शहरातील विविध गुन्ह्यांची उकल करून पोलिसांनी चार कोटींचा मुद्देमाल जप्त केला आहे. हा मुद्देमाल पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांच्या हस्ते संबंधित तक्रारदारांना परत करण्यात आला. यावेळी त्यांनी रेहान कुरेशीच्या प्रकरणात केलेल्या तपासाबाबत नवी मुंबईपोलिसांचीही पाठ थोपटली.पोलीस आयुक्तालय क्षेत्रात घडलेल्या विविध गुन्ह्यांची गत कालावधीत उकल झालेली आहे. त्यानुसार १९१ गुन्ह्यांमध्ये चोरीला गेलेल्या मुद्देमालापैकी ४ कोटी ३ लाख १९१ रुपये किमतीचा मुद्देमाल चोरट्यांकडून हस्तगत केलाआहे.पोलिसांनी न्यायालयाची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करून हा मुद्देमाल संबंधित तक्रारदारांना परत केला. त्यामध्ये ८९ वाहने व ६३ सोन्याच्या दागिन्यांचा तसेच मोबाइल व रोख रकमेचा समावेश आहे. राज्याचे पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांच्या हस्ते मंगळवारी पोलीस मुख्यालयाच्या आवारात हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी गुन्ह्यांची उकल करून त्यामध्ये जप्त केलेला ऐवज तक्रारदारांना परत करणे हा पोलिसांच्या आयुष्यातील आनंदाचा क्षण असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. यासाठी न्यायालयाची अत्यंत कठीण प्रक्रिया असून नवी मुंबई पोलिसांनी तीवेळेत पूर्ण केल्याचेही समाधान व्यक्त केले.नवी मुंबईसह मुंबई, ठाणे व पालघर जिल्ह्यात अल्पवयीन मुलींवर बलात्कार करून आठ वर्षांपासून सीआयडी तसेच पोलिसांना चकमा देणाऱ्या रेहान कुरेशीला अटक केल्याबद्दल देखील नवी मुंबई पोलिसांची कौतुकाने पाठ थोपटली. पोलिसांना त्यांच्या कार्यक्षेत्राची मर्यादा असते, तर गुन्हेगारांना कसलीही मर्यादा नसते. मात्र नवी मुंबई पोलिसांनी अत्यंत शिताफीने आपल्या हद्दीसह इतर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हे उघडकीस आणल्याचेही गौरवोद्गार त्यांनी काढले. यावेळी कार्यक्रमास पोलीस आयुक्त संजय कुमार, सह आयुक्त सुरेशकुमार मेकला, गुन्हे शाखा उपआयुक्त तुषार दोशी, उपआयुक्त पंकज डहाणे, सुधाकर पठारे, अशोक दुधे, राजेश बनसोडे आदी उपस्थित होते.कार्यक्रमप्रसंगी पोलिसांसाठी उभारण्यात आलेली व्यायामशाळा, महिला सहाय्यता कक्ष तसेच पोलीस व त्यांचे कर्मचारी यांच्यासाठी फिरते रुग्णालय यांचा शुभारंभ महासंचालकांच्या हस्ते करण्यात आला. तसेच पोलिसांसाठी २५० हेल्मेटचेही वाटप करण्यात आले. यावेळी शहरातील वाहतूककोंडी व जप्तीची वाहने यांची मोठी समस्या ठरत असून त्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे आयुक्त संजय कुमार यांनी सांगितले.गुन्ह्यामध्ये अथवा अपघातात जप्त केलेले वाहन विम्याचा कालावधी संपल्यानंतर संबंधितांकडून घेण्यास टाळाटाळ केली जाते. अशी २४४ असून त्यापैकी १०६ वाहनांची विल्हेवाट आजवर लावली असून १०८ वाहनांची प्रक्रिया सुरू असल्याचेही ते म्हणाले. सदर कार्यक्रमास पोलीस अधिकारी, कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.एखाद्या गुन्ह्यात चोरीला गेलेला ऐवज परत मिळेलच याची अपेक्षा राहत नाही. मात्र पोलिसांकडून कौशल्यपूर्ण तपासाअंती चोरीला गेलेला ऐवज परत मिळाल्याची भावना तक्रारदार निवृत्त पोलीस निरीक्षकअरविंद जयकर यांनी व्यक्त केली.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईPoliceपोलिस