देशाच्या हवाई वाहतूक क्षेत्रात आज एक ऐतिहासिक टप्पा पार पडला. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल-१ चे उद्घाटन झाले. त्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाश शिंदे यांच्यासह अनेक नेते तिथे उपस्थित होते. गेल्या २८ वर्षांपासून पाहिलेले हे स्वप्न अखेर आज प्रत्यक्षात साकार झाले आहे. या नवीन विमानतळामुळे मुंबईतील हवाई प्रवासाला नवी दिशा मिळणार आहे.
नवी मुंबई विमानतळावरून प्रत्यक्ष विमान वाहतूक नोव्हेंबरच्या मध्यात सुरू होईल. पुढील पाच ते सात वर्षांतच मुंबईचे सध्याचे आंतरराष्ट्रीय विमानतळ दुय्यम ठरेल आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हेच महामुंबईचे मुख्य विमानतळ म्हणून जगाच्या नकाशावर ओळखले जाईल, असे तज्ज्ञांचे मत आहे.
सध्या देशात सर्वाधिक उड्डाणे होणारे विमानतळ म्हणून दिल्लीचा पहिला क्रमांक आहे. तर, मुंबईचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ दुसऱ्या क्रमांकावर आहे. मात्र, नवी मुंबई विमानतळामुळे हे चित्र लवकरच बदलण्याची शक्यता आहे.
मुंबई वाढत गेली तशी दुसरी मुंबई म्हणून नवी मुंबईकडे पाहिले गेले. आराखडे, तज्ज्ञांचे अहवाल, राजकीय इच्छाशक्ती आणि अनेक पातळीवरील अडथळे पार पाडत अखेर हा प्रकल्प पूर्णत्वास आला. या प्रकल्पामुळे नवी मुंबईच्या नावलौकिकात मोठी भर पडली आहे.
Web Summary : Prime Minister Modi inaugurated Navi Mumbai International Airport, a major boost for travelers. It will ease congestion at Mumbai's main airport and cater to future air travel needs, offering relief to Mumbai and Pune residents.
Web Summary : प्रधानमंत्री मोदी ने नवी मुंबई अंतर्राष्ट्रीय हवाई अड्डे का उद्घाटन किया, जो यात्रियों के लिए एक बड़ी राहत है। यह मुंबई के मुख्य हवाई अड्डे पर भीड़ कम करेगा और भविष्य की हवाई यात्रा की जरूरतों को पूरा करेगा, जिससे मुंबई और पुणे के निवासियों को राहत मिलेगी।