पनवेलमध्ये प्लास्टिकचे अंडे

By Admin | Updated: May 26, 2017 00:32 IST2017-05-26T00:32:14+5:302017-05-26T00:32:14+5:30

प्लास्टिकच्या अंड्यांमुळे हैद्राबादला मध्यंतरी खळबळ माजली होती. त्याच घटनेची पुनरावृत्ती नवीन पनवेलमधील सुकापूर येथे बुधवारी झाली.

Plastic eggs in Panvel | पनवेलमध्ये प्लास्टिकचे अंडे

पनवेलमध्ये प्लास्टिकचे अंडे

लोकमत न्यूज नेटवर्क
पनवेल : प्लास्टिकच्या अंड्यांमुळे हैद्राबादला मध्यंतरी खळबळ माजली होती. त्याच घटनेची पुनरावृत्ती नवीन पनवेलमधील सुकापूर येथे बुधवारी झाली. शिवा कॉम्प्लेक्समधील एका दुकानातून ग्राहकाने सात अंडी खरेदी केली. त्यातील एक अंडे प्लास्टिकचे असल्याचे उघड झाल्याने सर्वत्र खळबळ माजली आहे. या प्रकरणी खांदेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
सुकापूर येथे राहणारे देवासग्यम विणकर यांनी सुकापूरमधील शिवा कॉम्प्लेक्स येथील एका दुकानातून ३० रुपयांची सहा अंडी खरेदी केली. दुकानदाराने देवासग्यम यांना त्या अंड्यावर एक अंडे मोफत दिले. सात अंडी घेवून घरी गेल्यानंतर सकाळी कामावर जाण्यापूर्वी टिफीनसाठी अंडी बनवली असता, त्यात एक अंडे प्लास्टिकचे असल्याचे त्यांच्या पत्नीला आढळून आले. त्यांनी पतीला ते दाखविले. त्यानंतर देवासग्यम यांनी नवी मुंबई पोलीस आयुक्तालय नियंत्रण कक्षात त्यांनी संपर्कासाठी फोन लावला, परंतु संपर्क होऊ शकला नाही. संबंधित प्रकार गंभीर असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी खांदेश्वर पोलीस ठाण्यात धाव घेऊन यासंदर्भात रीतसर तक्रार नोंदविली. खांदेश्वर पोलिसांनी देखील या घटनेची गंभीर दखल घेत अन्न व औषध प्रशासनाच्या मार्फत मदत घेऊन सत्यता पडताळून पाहणार असल्याचे सांगितले. या घटनेसंदर्भात साहाय्यक पोलीस निरीक्षक नांगरे, पोलीस हवालदार विजय यादव हे खांदेश्वर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ जयराज छापरिया यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास करीत आहे.

Web Title: Plastic eggs in Panvel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.