नवी मुंबईतील दहा उद्याने टाकणार कात; ‘एमआयडीसी’तील रस्त्यांचे करणार सुशोभीकरण
By नारायण जाधव | Updated: February 28, 2024 18:23 IST2024-02-28T18:22:51+5:302024-02-28T18:23:03+5:30
ज्या दहा उद्यानांचे नूतनीकरण करण्याची घोषणा आयुक्त राजेश नार्वेकर यांनी केली आहे.

नवी मुंबईतील दहा उद्याने टाकणार कात; ‘एमआयडीसी’तील रस्त्यांचे करणार सुशोभीकरण
नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील सध्याच्या उद्यानांमध्ये आणखी अत्याधुनिक सुविधा पुरवून त्यांचे नूतनीकरण करण्याचा निर्णय प्रशासानाने घेतला आहे. यात येत्या वर्षभरात दहा उद्यानांचे नूतनीकरण करण्यात येणार आहे.
ज्या दहा उद्यानांचे नूतनीकरण करण्याची घोषणा आयुक्त राजेश नार्वेकर यांनी केली आहे, त्यामध्ये नेरूळ विभागातील से. १८ येथील शांताराम भोपी उद्यान, से. ११ मधील स्टेप गार्डन, से. ३ येथील चाचा नेहरू उद्यान, से.११ येथील सरदार वल्लभभाई पटेल उद्यान, जुईनगर से.२४, भू.क्र.१ येथील सार्वजनिक उद्यान, से.१९ येथील स्व. आर. आर. पाटील उद्यान, तुर्भे विभागातील संत शिरोमणी तुकाराम महाराज उद्यान, से. ७ सानपाडा उद्यान, कोपरखैरणे से. २२ येथील उद्यान, ऐरोली से. १० मधील यशवंतराव चव्हाण उद्यान यांचा समावेश आहे.
वाशीत नवा ट्री बेल्ट
याशिवाय नव्या वर्षात वाशी सेक्टर-१० स्वामी नारायण मंदिर ते जुहूगाव स्मशानभूमी असा ट्री बेल्ट विकसित करणे इ. कामे २०२४-२५ मध्ये आवश्यकतेनुसार हाती घेण्यात येणार आहेत.
एमआयडीसीत सीएसआर निधीमधून सुशोभीकरण
एमआयडीसी क्षेत्रातील १६ कंपन्यांना २५ ठिकाणचे रस्ता दुभाजक व चौक सीएसआर निधीमधून सुशोभीकरण करण्याकरिता देण्यात येणार आहेत.