शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
2
बिहारच्या राजकारणात नवं समीकरण! भाजपाला पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपद; सम्राट चौधरी घेणार शपथ, निशांत कुमार उपमुख्यमंत्री
3
नेस्को ड्रग्ज पार्टीचे कल्याण कनेक्शन; दोघांच्या मृत्यूनंतर ड्रग्ज देणाऱ्याला पहाटे अटक, तिसऱ्याचा शोध सुरु
4
“अभी तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है…”; मुंबईतून इराणचे अमेरिकेला थेट प्रत्युत्तर
5
NEFT vs RTGS vs IMPS vs UPI: पैसे ट्रांसफर करण्यासाठी कोणता पर्याय कधी वापरावा?
6
कोण आहेत पिरोजशा? ज्यांच्या हाती आली १२७ वर्ष जुन्या Godrej ची धुरा, १.५६ लाख कोटींचं आहे साम्राज्य
7
वडिलांनी मजुरी केली, दागिने विकून आईनं मुलासाठी बूट खरेदी केले; IPL मध्ये चमकला साकीब हुसैन
8
साधी राहणी अन् कोट्यवधींची मालमत्ता! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह वादाच्या भोवऱ्यात
9
फॅमिली कार घ्यायचीय? ८.८० लाखांची ही ७ सीटर पडली सर्वांवर भारी! टोयोटा आणि महिंद्राला मागे टाकत ठरली नंबर १; पाहा टॉप-१० यादी
10
दक्षिण चीन सागरात १७ हजार सैनिक का जमले?; चीनच्या वर्चस्वाला थेट आव्हान देण्याची ७ देशांची तयारी
11
"आशाई, हे तात्पुरतं 'गुडबाय'! पण मला माहितीये..."; आशा भोसलेंची नात जनाईची भावूक पोस्ट
12
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
13
लग्नाचा मांडव की लुटीचा अड्डा? 'लुटेरी दुल्हन'चा थरार; अशी करायचे फसवणूक
14
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
15
एसी लोकल सांगाड्यापासून नॉन एसी गाड्या, कुर्ला कारशेडमध्ये दाखल, ५,७०० प्रवासी करू शकतील प्रवास
16
पराभवांतून धडा घ्या किंवा एकटे पडून राहा! सलग तिसऱ्या पराभवानंतर कर्णधार हार्दिक संतापला
17
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
18
Video - १२ महिन्यांत फेडलं ८० लाखांचं कर्ज; अमेरिकेतील भारतीय तरुणीच्या कर्तृत्वाने जग अवाक
19
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
20
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
Daily Top 2Weekly Top 5

पेट्रोलने भरलेल्या टँकरने घेतला पेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2017 05:26 IST

पनवेल तालुक्यातील भोकरपाडा येथे रविवारी पहाटे वाशी येथून २० हजार लीटर पेट्रोलने भरलेला टँकर औरंगाबादकडे जात असताना रस्त्याच्या कडेला उलटला. त्यानंतर टँकरमधील पेट्रोल नाल्यात मिसळून त्यातून

लोकमत न्यूज नेटवर्कपनवेल : पनवेल तालुक्यातील भोकरपाडा येथे रविवारी पहाटे वाशी येथून २० हजार लीटर पेट्रोलने भरलेला टँकर औरंगाबादकडे जात असताना रस्त्याच्या कडेला उलटला. त्यानंतर टँकरमधील पेट्रोल नाल्यात मिसळून त्यातून आगीचा भडका उडाला. यात टँकर पूर्णपणे जळून खाक झाला असून टँकरचालकासह इतर पाच पादचारी किरकोळ जखमी झाले आहेत.वाशी येथून २० हजार लीटर पेट्रोल असलेला टँकर (एमएच ०४ डीडी १९७२) घेऊन चालक पहाटेच्या वेळी औरंगाबादकडे जात होता. याच दरम्यान चालकाचा टँकरवरील ताबा सुटून तो मुंबई-पुणे महामार्गावरील भोकरपाडा येथील नाल्याजवळ रस्त्याच्या डाव्या बाजूला उलटला. टँकरमधील पेट्रोल बाजूच्या नाल्यातील पाण्यात मिसळून त्यातून आगीचा भडका उडाला.आगीत टँकर पूर्णपणे जळून खाक झाला असून चालक जखमी झाला. चालक घटनास्थळावरून पळून गेला आहे. तर टँकरमधील पेट्रोलचा भडका उडाल्याने पादचारी जेनीफ अली (१९), अलगीर (३१), अब्दुल अलीम (२०), सद्दाम हुसेन (२२) व खालिफ शेख (२५) (सर्व राहणार भोकरपाडा) हे किरकोळ भाजले असून त्यांना कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.आगीची माहिती मिळताच पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस, पनवेल महापालिका अग्निशमन दल, सिडको अग्निशमन दल, मोहोपाडा व रसायनी-पाताळगंगा येथील अग्निशमन दल, रिलायन्स कंपनीच्या फोमच्या गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या. या प्रकारामुळे महामार्गावर दोन्ही बाजूला दुपारपर्यंत मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी झाली होती.