पनवेल महापालिके साठी जनतेचाकौल कु णाला?

By Admin | Updated: May 26, 2017 00:19 IST2017-05-26T00:19:08+5:302017-05-26T00:19:08+5:30

स्थापनेपासून विविध विषयांच्या माध्यमातून चर्चेत राहिलेल्या पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीचा निकाल शुक्रवार, २६ मे रोजी लागणार आहे

People of the public for the Panvel Municipal Corporation? | पनवेल महापालिके साठी जनतेचाकौल कु णाला?

पनवेल महापालिके साठी जनतेचाकौल कु णाला?

वैभव गायकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
पनवेल : स्थापनेपासून विविध विषयांच्या माध्यमातून चर्चेत राहिलेल्या पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीचा निकाल शुक्रवार, २६ मे रोजी लागणार आहे. सकाळी १० वाजता प्रभागनिहाय निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या सहा विभागीय कार्यालयांत मतमोजणीला सुरुवात होणार आहे. निकालानंतरच पालिकेवर कोणाची सत्ता येणार हे स्पष्ट होणार आहे. २० प्रभागांत ७८ जागांसाठी एकूण ५५ टक्के मतदान बुधवार, २४ मे रोजी पार पडले. भाजपा -आरपीआय युती, शेकाप -राष्ट्रवादी-काँग्रेसची महाआघाडी, शिवसेना अशी ही तिरंगी लढत असून, या लढतीत जनतेने कोणाला कौल दिला आहे, ते आज स्पष्ट होणार आहे.
पनवेल महानगरपालिकेच्या २० प्रभागांत एकूण ४ लाख २५ हजार ४६४ मतदार आहेत. यामध्ये १ लाख ९६ हजार ७९० महिला, तर २ लाख २८ हजार ६७४ पुरुष मतदार आहेत. पहिल्याच महानगरपालिकेच्या निवडणुकीत मतदारांमध्ये काही प्रमाणात अनुत्साह दिसून आला. सुट्ट्यांचे दिवस असल्याने अनेक मतदार गावी गेल्याने मतदानाचा टक्का ५५च्या पुढे जाऊ शकला नाही. त्यामुळे तब्बल १ लाख ९२ हजार ३६९ मतदारांनी मतदानच केले नाही. मतदानाचा टक्का वाढण्यासाठी पालिकेने राबविलेल्या विविध योजनादेखील या मतदारांना मतदान करण्यास प्रवृत्त करण्यासाठी अपयशी ठरल्याचे दिसून येत आहे.
पालिकेच्या ७८ जागांसाठी एकूण ४१८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. जनतेने काय कौल दिला आहे, याची सर्वच उमेदवारांना चिंता लागलेली असून, निकालाबाबत साऱ्यांनाच उत्सुकता आहे. तर पनवेल महानगरपालिकेत कोणता पक्ष विजयी होणार, याकरितादेखील सट्टा लागला असल्याची माहिती मिळते. निकालावर कोट्यवदी रुपयांचा सट्टा लागला असल्याचे समजते.

मतमोजणीची ठिकाणे
पालिकेच्या एकूण २० प्रभागांसाठी प्रभागनिहाय निवडणूक निर्णय अधिकारी नेमले आहेत. सहा ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची कार्यालये आहेत. त्या ठिकाणी प्रभागनिहाय मतमोजणी सकाळी १० वाजता सुरू होणार आहे. या ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त असणार आहे. पनवेल महापालिका निवडणूक प्रक्रि येसाठी मनपा हद्दीत प्रभागनिहाय सहा केंद्र तयार करण्यात आली आहेत. यात प्रभाग क्र मांक १, २, ३साठी रयत शिक्षण संस्थेचे नावडे येथील परशुराम जोमा म्हात्रे विद्यालय व आत्माराम धोंडू म्हात्रे ज्युनियर कॉलेज, प्रभाग ४, ५, ६साठी खारघरमधील टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, प्रभाग ७, ८, ९, १०साठी कळंबोलीतील काळभैरव इमारत, प्रभाग ११, १२, १३साठी कामोठे न्यू इंग्लिश स्कूल, प्रभाग १४, १५, १६साठी पनवेलमधील के. व्ही. कन्या विद्यालय आणि प्रभाग १७, १८, १९, २०साठी कोएसोचे पनवेल येथील इंदूबाई वाजेकर माध्यमिक शाळा या केंद्रांचा समावेश आहे. एकाच वेळी या सहा केंद्रावर मतदान मोजणी होणार आहे. साधारणत: दुपारी १२ वाजता विजयी उमेदवारांचे चित्र स्पष्ट होणार आहे.

Web Title: People of the public for the Panvel Municipal Corporation?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.