पादचारी मृत्यू प्रकरण, पोलिसांनी पीडब्ल्यूडीकडे मागवला अहवाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2019 23:26 IST2019-07-13T23:26:30+5:302019-07-13T23:26:37+5:30
सायन-पनवेल मार्गावर सानपाडा येथे उघड्यावर पडलेल्या विद्युत वायरचा शॉक लागून पादचाऱ्याच्या मृत्यूची घटना घडली होती.

पादचारी मृत्यू प्रकरण, पोलिसांनी पीडब्ल्यूडीकडे मागवला अहवाल
नवी मुंबई : सायन-पनवेल मार्गावर सानपाडा येथे उघड्यावर पडलेल्या विद्युत वायरचा शॉक लागून पादचाऱ्याच्या मृत्यूची घटना घडली होती. या प्रकरणी पोलिसांनी पीडब्ल्यूडीकडे अहवाल मागवला असून, त्यानंतर संबंधितांविरोधात गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.
सानपाडा जंक्शन येथील पुलाखाली उघड्यावर पडलेल्या विद्युत वायरमुळे सुरेश जुनघरे या पादचाºयाचा ७ जुलैला मृत्यू झाला होता. या प्रकरणी संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी त्यांच्या नातेवाइकांनी केली होती. त्याशिवाय घटनेच्या दुसºयाच दिवशी युवक काँग्रेसने पीडब्ल्यूडीच्या कार्यालयावर मोर्चा काढून दोषी अधिकाऱ्यांना बेड्या ठोकण्याची मागणी केली होती. सायन-पनवेल मार्गावर अनेक समस्या भेडसावत असून त्यापैकी काही समस्या वर्षानुवर्षे जशाच्या तशाच आहेत. मार्गावर जागोजागी पथदिवे बंद स्थितीत असल्याने रात्रीच्या वेळी वाहनचालकांची गैरसोय होत आहे. तर प्रत्येक वर्षी पावसाळ्यात पडणारे खड्डे दुचाकीस्वारांच्या मृत्यूचे कारण ठरत आहेत, त्यामुळे सानपाडा येथील दुर्घटना प्रकरणीही पोलिसांनी संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करण्याची तयारी दर्शवली आहे. त्याकरिता घडलेल्या दुर्घटनेत नेमका हलगर्जीपणा कोणाचा, याबाबत पीडब्ल्यूडीकडे विचारणा करण्यात आली आहे. पोलिसांना या संबंधीचा अहवाल प्राप्त होताच त्याद्वारे संबंधितांवर गुन्हा दाखल केला जाणार आहे.
दोन वर्षांपूर्वी उरणफाटा येथील पुलावरही घडलेल्या अपघात प्रकरणी पीडब्ल्यूडीच्या अधिकाºयांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यानंतरही सायन-पनवेल मार्गावरील कामाच्या दर्जात व गैरसोयींमध्ये सुधारणा होताना दिसत नसल्याचा संताप प्रवाशांकडून व्यक्त होत आहे.