शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
5
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
6
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
7
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
8
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
9
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
10
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
11
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
12
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
13
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
14
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
15
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
16
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
17
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
18
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
19
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
20
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!

रासायनिक कंपनीमधून बाहेर पडणाऱ्या विषारी क्रोमियमवर पेटंट, पनवेल महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ. अनिल पालवे यांचे संशोधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2021 00:31 IST

डॉ. अनिल  पालवे यांना विषारी क्रोमियम (VI)चे रूपांतर करून बिनविषारी क्रोमियम (III) मध्ये  केले.  यासाठी त्यांना भारत सरकार कडून पेटंट प्राप्त झाले आहे. या  पेटंटमुळे औद्योगिक क्षेत्रातील  ज्या कंपनीमध्ये क्रोमियमचा वापर  होत आहे अशा  कंपन्यांतील जलप्रदूषणास आळा बसणार आहे. 

नवीन पनवेल : टिटॅनियम डायऑक्साइड या फोटो कॅटलिस्टचा वापर जगभर होतो. परंतु, टिटॅनियम डायऑक्साइड हा फक्त अल्ट्राव्हायलेट प्रकाशाचे शोषण करतो. मात्र दृश्यमान प्रकाश टिटॅनियम डायऑक्साइडमध्ये शोषला जात नाही. या पदार्थाची ही उणीव भरून काढण्यासाठी डॉ. अनिल पालवे यांनी अल्ट्राव्हायलेट व दृश्यमान प्रकाशाचे शोषण करणाऱ्या कंपोझिटचा आविष्कार करून पेटंट मिळवले आहे.  सध्या डॉ. अनिल पालवे,  पनवेल येथील महात्मा फुले  आर्ट, सायन्स, व कॉमर्स महाविद्यालयामध्ये रसायनशास्त्राचे असोसिएट प्रोफेसर म्हणून कार्यरत आहेत. (Patent on toxic chromium leaked from a chemical company, Panvel College Professor Dr. Research by Anil Palve) शिरापूर, अहमदनगर, येथील मूळ रहिवासी असणाऱ्या डॉ. अनिल  पालवे यांना विषारी क्रोमियम (VI)चे रूपांतर करून बिनविषारी क्रोमियम (III) मध्ये  केले.  यासाठी त्यांना भारत सरकार कडून पेटंट प्राप्त झाले आहे. या  पेटंटमुळे औद्योगिक क्षेत्रातील  ज्या कंपनीमध्ये क्रोमियमचा वापर  होत आहे अशा  कंपन्यांतील जलप्रदूषणास आळा बसणार आहे. वरील प्रक्रियेमध्ये झिंक ऑक्साईड/  कॅडमियम सल्फाइड/ ग्राफीन ऑक्साईड  या कंपोझिटचा व सौरऊर्जेचा वापर करून विषारी क्रोमियमचे रूपांतर बिनविषारी क्रोमियममध्ये कमी वेळात  होण्यास मदत होते. तसेच  निर्माण झालेल्या क्रोमियम (III) घनरूप पदार्थ बनवून विलगीकरण सहज शक्य होणार आहे. वरील कंपोझिटचा वापर हा सूर्यप्रकाशात होत असल्यामुळे विजेची बचत होणार आहे. हे कंपोझिट बनवण्यासाठी  कमीत कमी वेळ व खर्च लागणार आहे. त्याचबरोबर अगदी कमी वेळेमध्ये विषारी क्रोमियमचे बिनविषारी क्रोमियममध्ये रूपांतर होणार आहे. अशी माहिती डॉ. अनिल पालवे व त्यांचे विद्यार्थी अजय लाथे यांनी दिली. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई