शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

महामार्गावरील खड्ड्यांवर पेव्हर ब्लॉकचा उतारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2018 01:43 IST

दुरुस्तीचे काम सुरू; प्रवाशांमधील असंतोष दूर करण्याचा प्रयत्न

नवी मुंबई : सायन-पनवेल महामार्गावरील खड्ड्यांचा प्रश्न सोडविण्यासाठी विविध उपाययोजनांची चाचणी केली जात आहे. मोठे खड्डे असलेल्या ठिकाणी पेव्हर ब्लॉक बसविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.महामार्गावरील खड्ड्यांचा प्रश्न गंभीर झाला आहे. वाशी, सानपाडा, तुर्भे, जुईनगर, नेरूळ, खारघर, कळंबोली परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने खड्डे बुजविण्यासाठी केलेले सर्व प्रयत्न फुकट गेले आहेत. खड्डे बुजविले की पावसामुळे काही दिवसांमध्ये पुन्हा खड्डे जैसे थे होत आहेत. दोन महिन्यांपासून सातत्याने पाऊस पडल्यामुळे खड्डे बुजविण्याच्या कामात अडथळे होऊ लागले आहेत. प्रवाशांमध्ये असंतोष निर्माण होऊ लागल्यामुळे अखेर प्रशासनाने खड्ड्यांमध्ये पेव्हर ब्लॉक बसविण्याचा निर्णय घेतला आहे. वाशी, सानपाडा उड्डाणपूल व इतर ठिकाणी मोठ्या प्रमाणात पेव्हर ब्लॉक बसविण्याचे काम सुरू आहे.पेव्हर ब्लॉकमुळे मोठ्या खड्ड्यांचा प्रश्न मिटेल असे बोलले जात आहे. दोन दिवसांपासून पेव्हर ब्लॉक बसविण्याचे काम वेगाने सुरू करण्यात आले.खड्ड्यांमुळे महामार्गावरील वाहतूककोंडीची समस्या जैसे थे आहे. वाहनांच्या मोठ्या रांगा लागत असून वाहतूककोंडीची समस्या कधी सुटणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

टॅग्स :Potholeखड्डेNavi Mumbaiनवी मुंबई