एसटीची वाट पाहणाऱ्या प्रवाशांची होणार ऊन-वारा-पावसापासून सुटका
By नारायण जाधव | Updated: February 12, 2024 18:58 IST2024-02-12T18:58:33+5:302024-02-12T18:58:46+5:30
प्रवाशांची ऊन-वारा-पावसापासून सुटका होणार असल्याने त्यांनी आनंद व्यक्त केला आहे.

एसटीची वाट पाहणाऱ्या प्रवाशांची होणार ऊन-वारा-पावसापासून सुटका
नवी मुंबई: सायन-पनवेल महामार्गावरील नवी मुंबईतील वाशी प्लाझाशेजारी बांधण्यात येणाऱ्या बस निवाऱ्याचे भूूमिपूजन बेलापूरच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या हस्ते करण्यात आले. यासाठी म्हात्रे यांनी ५० लाख रुपये आमदार निधी दिला आहे. या बस निवारा केंद्रात प्रवाशांसाठी वेटिंग रूम, सुलभ शौचालय, उद्यान उपलब्ध करून देणार आहे. ही सुविधा पूर्ण झाल्यानंतर बसची वाट पाहत थांबणाऱ्या प्रवाशांची ऊन-वारा-पावसापासून सुटका होणार असल्याने त्यांनी आनंद व्यक्त केला आहे.
बेलापूर मतदारसंघांमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत प्रथमच २० कोटी रुपयांतून सायन-पनवेल महामहामार्गालगत असलेल्या नागरिकांना तसेच प्रवाशांना विविध सुविधा पुरविण्यात येणार आहेत. यावेळी पत्रकार विश्वरत्न नायर, समाजसेवक पांडुरंग आमले, अशोक विधाते, विकास सोरटे, अशोक चटर्जी, रूपेश मढवी, शशी भानुशाली, प्रवीण भगत, प्रताप भोसकर, महेश दरेकर, आशाराम राजपूत, जयेश थोरवे, सुभाष गायकवाड, संगीता म्हात्रे, अलका म्हात्रे व असंख्य नागरिक उपस्थित होते.