लोकल वर दगडफेकीत प्रवाशी मुलगा जखमी, डोळ्याला मार
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2023 23:00 IST2023-09-21T23:00:29+5:302023-09-21T23:00:40+5:30
जखमी अवस्थेत त्याला सायंकाळी ५.४५ वाजता महापालिकेच्या वाशी येथील प्रथम संदर्भ रुग्णालयात उपचार करून घरी पाठवण्यात आले आहे.

लोकल वर दगडफेकीत प्रवाशी मुलगा जखमी, डोळ्याला मार
अनंत पाटील
नवी मुंबई - ट्रान्स हार्बर रेल्वे मार्गावरील नेरुळ -ठाणे लोकल वर दिघा चिंचपाडा ब्रीज दरम्यान काही अज्ञात व्यक्तींने दगड भिरकावल्याने एक १८ वर्षीय मुलगा जखमी झाल्याची दुर्घटना गुरुवारी २१ सप्टेंबर रोजी सायंकाळी ४.३० वाजताच्या सुमारास घडली आहे.
शंकर ईश्वर चव्हाण, वय १८, रा. छत्रपती चाळ, सेक्टर २, ऐरोली. नवी मुंबई असे रेल्वे प्रवास करणाऱ्या जखमी मुलाचे नाव आहे. यात शंकर राठोड यांच्या डाव्या डोळ्याला मार लागला असून त्याच्यावर सायंकाळी ५ वाजता नवी मुंबई महापालिकेच्या ऐरोली येथील राजमाता जिजाऊ रुग्णालयात प्रथमोपचार करण्यात आले. जखमी शंकर राठोड सह त्याचा सुनील राठोड आणि त्याचा मित्र राहुल जाधव ऐरोली हून ठाणे येथे खरेदी साठी जात होते. त्यावेळी ऐरोली दिघा रेल्वे स्टेशन दरम्यान दगड फेकीत ही दुर्दैवी घटना घडली. जखमी अवस्थेत त्याला सायंकाळी ५.४५ वाजता महापालिकेच्या वाशी येथील प्रथम संदर्भ रुग्णालयात उपचार करून घरी पाठवण्यात आले आहे.
ऐरोली स्टेशन नंतर दिघा स्टेशन हद्दीत झोपडपट्टी लागते. काही अज्ञात गांजा मास्तरांनी हा प्रकार केला असावा, असा संशय व्यक्त केला जात आहे.