पार्थ पवार यांची पनवेलमधील कर्नाळा स्पोर्ट्स एकादमीला भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2018 16:00 IST2018-11-17T16:00:04+5:302018-11-17T16:00:07+5:30
अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी पनवेलमधील कर्नाळा स्पोर्ट्स येथे शनिवारी सदिच्छा भेट दिली.

पार्थ पवार यांची पनवेलमधील कर्नाळा स्पोर्ट्स एकादमीला भेट
- वैभव गायकर,
पनवेल: अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी पनवेलमधील कर्नाळा स्पोर्ट्स येथे शनिवारी सदिच्छा भेट दिली. ही भेट सदिच्छा असली तरी लोकसभा निवडणुकीसाठी मावल मतदार संघातुन पार्थ पवार इच्छुक असल्याचे समजते. पार्थ पवार यांच्या या सदिच्छा भेटीच्या वेळी माजी आमदार विवेक पाटील, आमदार बाळाराम पाटील, माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे, सिडकोचे माजी अध्यक्ष प्रमोद हिंदुराव, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पमपा जिल्हा अध्यक्ष तथा नगरसेवक सतीश पाटील, शेकापचे माजी पनवेल तालुका चिटणीस नारायणशेठ घरत, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पमपा जिल्हा कार्याध्यक्ष शिवदास कांबळेऑलिम्पियन सुमा शिरूर, कर्नाळा स्पोर्ट्सच्या सीईओ शमा फाटक हट्टंगडी, कर्नाळा इन्फ्रा प्रोजेक्ट्सचे संचालक राजेश हातमोडे गणेश कड़ू आदी उपस्थित होते. मावळ लोकसभा मतदारसंघातून पार्थ पवार निवडणूक लढवणार असल्याची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू आहे.