जुन्या प्रांत कार्यालयाच्या इमारतीचा काही भाग कोसळला
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2019 22:46 IST2019-08-08T22:46:10+5:302019-08-08T22:46:19+5:30
पनवेल : पनवेल शहरातील जुन्या प्रांत कार्यालयाच्या इमारतीचा काही भाग गुरुवारी रात्री ९.४५ मिनिटांनी कोसळला. ही इमारत पालिकेने धोकादायक घोषित ...

जुन्या प्रांत कार्यालयाच्या इमारतीचा काही भाग कोसळला
पनवेल : पनवेल शहरातील जुन्या प्रांत कार्यालयाच्या इमारतीचा काही भाग गुरुवारी रात्री ९.४५ मिनिटांनी कोसळला. ही इमारत पालिकेने धोकादायक घोषित केली आहे.
या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. या इमारतीत सरकारी कार्यालये होती. चार वर्षांपूर्वी ही इमारत रिकामीच आहे. दुमजली इमारतीचे बांधकाम जीर्ण झाले आहे. या इमारतीच्या आजूबाजूला रहिवासी संकुल असल्याने पालिका शुक्रवारी ही इमारत जमीनदोस्त करणार आहे.