शहरात वाहनचालकांकडून पार्किंगच्या नियमांचे उल्लंघन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2018 03:29 AM2018-10-01T03:29:23+5:302018-10-01T03:29:42+5:30

वाहतूककोंडीमुळे नागरिक हैराण : कारवाईकडे वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष

Parking rules violation by drivers in the city | शहरात वाहनचालकांकडून पार्किंगच्या नियमांचे उल्लंघन

शहरात वाहनचालकांकडून पार्किंगच्या नियमांचे उल्लंघन

Next

नवी मुंबई : सीबीडी, सीवूड, नेरु ळ, जुईनगर, सानपाडा भागातील वर्दळ असणाऱ्या प्रमुख रस्त्यांच्या कडेला होणाºया बेकायदा पार्किंगमुळे वाहतूककोंडी टाळण्यासाठी नो पार्किंग, समांतर पार्किंग, सम-विषम पार्किंगचे फलक बसविण्यात आले आहेत; परंतु वाहनचालकांकडून फलकावरील नियमांचे उल्लंघन होत असून, होणाºया वाहतूककोंडीमुळे नागरिक हैराण झाले आहेत. नियम मोडणाºया वाहनांवर कारवाई करण्याकडे वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष झाल्याचा आरोप नागरिक करीत आहेत.

नवी मुंबई शहर हे २१ व्या शतकातील शहर म्हणून ओळखले जाते. शहराची रचना नियोजनबद्ध झाली असली, तरी वाढत्या नागरीकीकरणामुळे शहरात वाहने पार्किंगची समस्या मोठ्या प्रमाणावर निर्माण झाली आहे. वाहने पार्किंगसाठी जागा नसल्याने जागा मिळेल त्या ठिकाणी वाहने पार्किंग होत आहेत. सीबीडी, सीवूड, नेरु ळ, जुईनगर, सानपाडा, वाशी भागातील सोसायट्या बाहेरील अरुं द रस्ते. मार्केट, रेल्वे स्थानके, चौक, शाळा-महाविद्यालयांबाहेरील रस्ते आदी ठिकाणच्या रस्त्यांच्याकडेला मोठ्या प्रमाणावर बेकायदा पार्किंग होत असल्याने वाहतूककोंडीची समस्या निर्माण होत आहे. शहरातील वाहतूककोंडी होणाºया ठिकाणांचा महापालिका आणि वाहतूक विभागाच्या वतीने सर्व्हे करून अनेक महत्त्वाच्या ठिकाणी नो पार्किंग, समांतर पार्किंग, सम-विषम पार्किंग आदी सूचनांचे पालिकेच्या माध्यमातून फलक लावण्यात आले आहेत; परंतु या सूचना फलकांना न जुमानता बिनदिक्कतपणे रस्त्यांच्या कडेला मोठ्या प्रमाणावर बेकायदा पार्किंग करण्यात येत आहे, त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी आणि सोसायट्यांबाहेर वाहतूककोंडीच्या समस्या निर्माण होत आहेत. विशेष म्हणजे, पार्किंगच्या नियमांचे फलक लावल्यावर त्या ठिकाणी होणाºया बेकायदा पार्किंगवर कारवाया करून नियंत्रण आणण्याचे वाहतूक पोलिसांकडून अपेक्षित असताना, यावर कारवाया केल्या जात नसल्याने बेकायदा पार्किंगचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. नेरु ळ, सीवूडमधील शाळांच्या बाहेरील रस्त्यावरही बेकायदा पार्किंग होत असल्याने या ठिकाणीही नो पार्किंगचे फलक लावण्यात आले आहेत; परंतु परिसरात राहणाºया नागरिकांकडून या ठिकाणी वाहने पार्किंग केली जात असल्याने, शाळा भरताना आणि सुटताना विद्यार्थी, पालकांची गर्दी शालेय बस, पालकांची वाहने, इतर वाहने यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूककोंडी होत आहे. फलक लावलेल्या ठिकाणी वाहतूक पोलिसांनी कारवाया कराव्यात, अशी मागणी नागरिक करीत आहेत.

पार्किंगच्या नियमांचे फलक बसविलेल्या ठिकाणी नियमांचे उल्लंघन होत असल्याची माहिती घेण्यात येईल आणि अशा वाहनांवर कारवाया करण्यात येतील. - सुनील लोखंडे, उपायुक्त, वाहतूक पोलीस

Web Title: Parking rules violation by drivers in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.