पार्किंग सिडकोची, वापर मॉलचा

By Admin | Updated: June 8, 2015 04:05 IST2015-06-08T04:05:17+5:302015-06-08T04:05:17+5:30

खारघर सेक्टर दोनमध्ये असलेल्या सिडकोच्या पार्किंगचा वापर लिटील वर्ल्ड मॉल व्यवस्थापनाकडून अनधिकृतपणे करीत असल्यामुळे मॉल प्रशासनाला सिडकोचा धाक राहिलेला नाही.

Parking CIDCO, use malls | पार्किंग सिडकोची, वापर मॉलचा

पार्किंग सिडकोची, वापर मॉलचा

पनवेल : खारघर सेक्टर दोनमध्ये असलेल्या सिडकोच्या पार्किंगचा वापर लिटील वर्ल्ड मॉल व्यवस्थापनाकडून अनधिकृतपणे करीत असल्यामुळे मॉल प्रशासनाला सिडकोचा धाक राहिलेला नाही. सिडकोची पे अँड पार्कची योजना सुरू होण्याआधीच या जागेवर मॉल व्यवस्थापनाकडून पार्किंगचा वापर सुरु केला आहे.
लिटील वर्ल्ड मॉलमध्ये दररोज हजारोंच्या संख्येने ग्राहक येतात. मॉल व्यवस्थापनाचीस्वतंत्र पार्किंग व्यवस्था असून देखील मॉलसमोर असलेल्या सिडकोच्या पार्किंगचा वापर मॉल प्रशासन करीत आहे. विशेष म्हणजे या पार्किंगला यापूर्वी सिडकोने बंद केले होते. त्याठिकाणी कुलूप देखील लावण्यात आले होते. मात्र कुलूप गायब झाले असून या पार्किंगचा वापर विनामूल्य मॉल प्रशासन करीत आहे. या पार्किंग व्यवस्थेवर लक्ष ठेवण्यासाठी सुरक्षा रक्षक देखील आहेत. ते सुरक्षा रक्षकच सिडकोच्या पार्किंगमध्ये गाड्या पार्ककरण्याची सूचना वाहनधारकांना करीत असतात. मात्र परवानगी न घेता अशा प्रकारे पार्किंगचा वापर करणाऱ्या मॉल व्यवस्थापनावर सिडको कारवाई करणार का, असा प्रश्न यावेळी उपस्थित होत आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Parking CIDCO, use malls