आरटीईच्या अंतर्गत प्रतीक्षा यादीतील पालक चिंतेत, शैक्षणिक नुकसानीची भीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2020 00:46 IST2020-08-31T00:46:10+5:302020-08-31T00:46:17+5:30

आरटीईच्या अंतर्गत २५ टक्के आरक्षित मोफत प्रवेशाची आॅनलाइन सोडत १७ मार्च, २०२० रोजी जाहीर करण्यात आलेली आहे. मात्र, लॉकडाऊनमुळे निवड यादीतील विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची पडताळणी होऊ शकली नव्हती.

Parents on the waiting list under RTE are worried, fear of academic loss | आरटीईच्या अंतर्गत प्रतीक्षा यादीतील पालक चिंतेत, शैक्षणिक नुकसानीची भीती

आरटीईच्या अंतर्गत प्रतीक्षा यादीतील पालक चिंतेत, शैक्षणिक नुकसानीची भीती

नवी मुंबई : आरटीईच्या अंतर्गत प्रवेशाची आॅनलाइन सोडत मार्च महिन्यात जाहीर करण्यात आली होती. मात्र, राज्यावर कोरोनाचे संकट असल्याने, निवड यादीतील विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची पडताळणी आणि प्रवेश प्रकिया सुरू होण्यास विलंब झाला आहे. शाळांमध्ये आॅनलाइन शिक्षण सुरू झाले असून, निवड यादीतील प्रवेश प्रक्रिया अद्याप पूर्ण झाली नाही. त्यामुळे प्रतीक्षा यादीमध्ये असलेल्या विद्यार्थ्यांचे प्रवेश होणार की नाहीत, याबाबत पालक चिंतेत आहेत.

आरटीईच्या अंतर्गत २५ टक्के आरक्षित मोफत प्रवेशाची आॅनलाइन सोडत १७ मार्च, २०२० रोजी जाहीर करण्यात आलेली आहे. मात्र, लॉकडाऊनमुळे निवड यादीतील विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची पडताळणी होऊ शकली नव्हती. या काळात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शासनाच्या माध्यमातून आॅनलाइन शिक्षण शाळा आणि महाविद्यालयांचे सुरू आहे, परंतु आरटीईच्या अंतर्गत प्रवेश प्रक्रियेला विलंब झाल्याने, या निवड यादीतील प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे. प्राथमिक शिक्षण संचालक पुणे यांच्या माध्यमातून १७ जून, २०२० रोजी निवड यादीतील विद्यार्थ्यांचे कागदपत्रे पडताळणी व प्रवेशाबाबत कार्यवाही करण्याची प्राथमिक जबाबदारी शाळेच्या मुख्याध्यापकांकडे सोपविण्यात आल्याचे पत्र देण्यात आले होते, परंतु शाळांच्या माध्यमातून अद्याप निवड यादीतील विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. महापालिकेने सदर प्रकियेला गती देण्याची मागणी केली जात आहे.

प्रवेश रद्द केलेल्या विद्यार्थ्यांची माहिती शाळेकडून घेणार
आरटीईच्या अंतर्गत निवड यादीतील विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्षाचे नुकसान होण्याची भीती पालकांमध्ये असून, महापालिकेने या प्रक्रियाला गती देऊन या प्रक्रियेतील सर्वच विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित करावेत.
- जयंत म्हात्रे, पालक, नेरुळ

निवड यादीतील विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया सुरू करण्याच्या सूचना शाळा प्रशासनांना करण्यात आल्या होत्या. या उपक्रमांतर्गत शहरात १०५ शाळा असून, प्रवेशाबाबत त्यांच्याकडून अपडेट घेतले जात आहे. प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी निवड यादीतील किती विद्यार्थ्यांनी प्रवेश रद्द केले आहेत, याची माहिती शाळांकडून घेत आहे.
- योगेश कडुसकर, शिक्षणाधिकारी न.मुं.म.पा.

Web Title: Parents on the waiting list under RTE are worried, fear of academic loss

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.