पनवेलचा पारा ३८ अंशांवर

By Admin | Updated: April 24, 2016 00:27 IST2016-04-24T00:27:45+5:302016-04-24T00:27:45+5:30

पनवेलच्या बाजारपेठ सकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत ग्राहकांच्या गर्दीने गजबजलेली असते. मात्र, गेल्या पंधरा दिवसांपासून तापमानाचा पारा वाढल्याने याचा परिणाम बाजारपेठेवरही झाला

Panvel's mercury is at 38 degrees | पनवेलचा पारा ३८ अंशांवर

पनवेलचा पारा ३८ अंशांवर

- अरूणकुमार मेहत्रे,  कळंबोली
पनवेलच्या बाजारपेठ सकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत ग्राहकांच्या गर्दीने गजबजलेली असते. मात्र, गेल्या पंधरा दिवसांपासून तापमानाचा पारा वाढल्याने याचा परिणाम बाजारपेठेवरही झाला आहे. दुपारी १२ च्या नंतर बाजारपेठेतील सर्व रस्ते ओस पडलेले दिसून येत असून, सायंकाळी ७ वाजल्यानंतर खरेदीसाठी नागरिक घराबाहेर पडताना दिसून येत आहेत.गेल्या आठवडाभरापासून तापमानाचा पारा चढता असून, पनवेलचे तापमान सध्या ३८ अंशावर आहे. सकाळपासूनच उन्हाचे चटके जाणवत असून, दुपारनंतर रस्त्यांवर शुकशुकाट दिसून येत आहे. वाढत्या तापमानाचा परिणाम आरोग्यावरही होत आहे.
उन्हाचा कडाका वाढत असल्याने उष्णतेची लाटही वाढली आहे. दर वर्षी मेमध्ये जाणवणारा उन्हाचा कडाका यंदा एिप्रलच्या मिहन्याच्या सुरु वातीलाच जाणवू लागला आहे. मागील आठवड्यापासून तर तापमानात असह्य वाढ होऊन, ३७ ते ३८ अंशाच्या घरात तापमान जाऊन पोहोचले आहे.
मे महिना सुरू होण्याआधीच एप्रिलमध्येच रणरणत्या कडक उन्हाच्या झळा बसत आहेत. दरम्यान, मागील वर्षाच्या तुलनेत यंदा मार्च महिन्यापासूनच तापमानात वाढ होत आहे. त्यामुळे मे महिन्यात तर तापमानाचा पारा अधिकच वाढण्याची शक्यता वर्तिवण्यात येत आहे.
संध्याकाळीही वातावरणात उकाडा जाणवत आहे. कामानिमित्त घराबाहेर पडावे लागत असल्याने बहुतांश नागरिक सकाळच्या सुमारासच महत्त्वाची कामे करायला प्राधान्य देताना दिसून येत आहे. एप्रिलच्या सुरु वातीपासूनच उष्णतेची प्रखरता जाणवू लागल्याने सर्दी, ताप, खोकला, घसा आदी आजारांच्या रु ग्णांमध्ये वाढ झालेली दिसून येत आहे. विशेष करून वाढत्या तापमानाचा परिणाम वृद्ध व बालकांवर होत असून, या रु ग्णांचीच संख्या रु ग्णालयांमध्ये दिसून येत आहे.
दरम्यान, उष्माघात टाळण्यासाठी भर उन्हात घराबाहेर न पडण्याचा सल्ला डॉक्टरांकडून देण्यात येत
आहे.

शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्यामुळे आजारी पडण्याची शक्यता असते. शरीरातील दाहकता कमी करण्यासाठी लिंबू सरबत व इतर थंडपेय घ्यावीत. मात्र, अति थंड पदार्थ घेऊ नयेत. त्यामुळे आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता असते. तसेच भर दुपारी घराबाहेर जाणे टाळावे.
- डॉ. बी.एस. लोहारे, वैद्यकीय अधीक्षक, पनवेल ग्रामीण रुग्णालय.

Web Title: Panvel's mercury is at 38 degrees