पनवेलचा तडीपार गुंड सुनील साबळेवर मोक्का

By Admin | Updated: July 30, 2015 00:09 IST2015-07-30T00:09:32+5:302015-07-30T00:09:32+5:30

वडघर येथील रहिवासी किशोर बाबरे यांच्यावर केलेला हल्ला सुनील साबळेला चांगलाच भोवला आहे. यापूर्वी खून, खंडणी, मारामारी आदी गुन्ह्यांची नोंद असलेल्या साबळेवर मोक्का लावण्यात आला आहे.

Panvel's brilliant goose rubbed on Sunil Saale | पनवेलचा तडीपार गुंड सुनील साबळेवर मोक्का

पनवेलचा तडीपार गुंड सुनील साबळेवर मोक्का

पनवेल : वडघर येथील रहिवासी किशोर बाबरे यांच्यावर केलेला हल्ला सुनील साबळेला चांगलाच भोवला आहे. यापूर्वी खून, खंडणी, मारामारी आदी गुन्ह्यांची नोंद असलेल्या साबळेवर मोक्का लावण्यात आला आहे. सुनील फरार आहे.
सुनील साबळे याच्यावर पनवेल पोलीस ठाण्यात दहा गुन्ह्यांची नोंद आहे. तसेच कर्जत पोलीस ठाण्यातही एक गुन्हा नोंदविण्यात आला आहे. वडघर ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये टोलेजंग इमारतींची कामे सुरू आहेत. बांधकाम साहित्य पुरविण्यावरून असोत किंवा वीजजोडणीचा ठेका मिळविण्यासाठी साबळे हा दबावतंत्राचा वापर करीत असल्याचे अनेक वेळा उघड झाले आहे. तसेच वडघर येथील विद्युत ठेकेदार किशोर बाबरे याने याठिकाणी वीजजोडणीचा ठेका घेतला होता यामुळे साबळे याने आपल्या हस्तकांमार्फत बाबरेवर प्राणघातक हल्ला केला असल्याचा आरोप किशोर याने केला होता. दबाव आल्यानंतर पनवेल पोलिसांनी साबळे याच्यावर मोक्काअंतर्गत गुन्हा नोंदविला आहे. सुनील साबळे हा ठाणे, मुंबई, उपनगर, रायगड या चार जिल्ह्यातून तडीपार केलेला गुंड आहे. बाबरेसह पाच जणांवर मोक्काअंतर्गत गुन्हा नोंदविला आहे. साबळे, कैकाडी या गँगची लढाई अनेक दिवसांपासून सुरू आहे.

Web Title: Panvel's brilliant goose rubbed on Sunil Saale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.