शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक
2
भारतात राहणारे सर्वच हिंदू; मुस्लीम आणि ख्रिश्चन आपल्याच पूर्वजांचे वंशज, काय म्हणाले सरसंघचालक मोहन भागवत
3
एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंना भाजपाचा मोठा धक्का; २ मोठ्या नेत्यांचा लवकरच पक्षप्रवेश होणार
4
सोनं की रिअल इस्टेट? गुंतवणुकीसाठी कोणता पर्याय ठरेल जास्त फायदेशीर? तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला
5
जेल की रिसॉर्ट? ISIS रिक्रूटर आणि सीरियल किलरकडे मोबाईल; अधिकाऱ्यांच्या मदतीने कैद्यांची मजा
6
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
7
प्रदूषणकारी रसायनांचे उत्पादन करणारा कारखाना रत्नागिरीच्या लोटे वसाहतीत
8
हत्येनंतर शीर अन् धड वेगळे केले, सुटकेसमध्ये मृतदेह लपवून फरार; अखेर १६ वर्षांनी आरोपीला अटक
9
महाराष्ट्राच्या १५ हजार एकर महसूल जमिनीसह सीमेवरील १४ गावांवर तेलंगण राज्याचा ताबा !
10
भारताकडे 'रेअर अर्थ'चा ५वा सर्वात मोठा खजिना; तरीही आयातीसाठी चीनवर का अवलंबून? 'ही' आहे खरी अडचण
11
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
12
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
13
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
14
"मला पुढच्या जन्मी गोविंदा पती म्हणून नकोय...", सुनीता अहुजाचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली- "हा एकच जन्म..."
15
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
16
ट्रॉलरसह आठ मच्छीमारांचे पाकिस्तानकडून अपहरण?
17
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
18
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
19
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
20
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!

नवी मुंबईसह पनवेलकर असह्य उकाड्याने झाले त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2018 00:59 IST

किमान तापमानातही वाढ : उष्माघाताच्या रुग्णांमध्ये ३० टक्क्यांनी वाढ

नवी मुंबई : गेल्या आठवडाभरापासून काही अंशांनी घटलेले तापमान पुन्हा वाढले असून, नवी मुंबईकर या उकाड्याने त्रस्त झाले आहेत. शहरातील तापमानामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. शहरातील तापमान ३८ अंशांवर गेले असून, उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून दिवसा कडक ऊन आणि रात्रीच्या वेळी किमान तापमानात घट झाल्याचे दिसून येत आहे. किमान तापमानातही वाढ झाली असून, हे तापमान ३९ अंशांवर पोहोचले आहे.नवी मुंबईतील आर्द्रता ४४ टक्के नोंदविण्यात आली आहे. यंदा एप्रिल महिन्याच्या प्रारंभीच उन्हाची तीव्रता नागरिकांना अधिक मोठ्या प्रमाणावर जाणवू लागली असून, ज्येष्ठ नागरिकांना याचा सर्वात जास्त त्रास जाणवत असून, उन्हामुळे उष्माघाताचे रु ग्ण नवी मुंबई व रायगड जिल्ह्यात वाढत असल्याचे सर्वेक्षण वाशीतील रुग्णालयाच्या वतीने नोंदविण्यात आले आहे. वाढलेल्या उष्मामुळे नागरिक हैराण झाले असून डोळे जळजळणे, अंगदुखी, डोकेदुखी, भूक मंदावणे आदी तक्रारींनी डोके वर काढले आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार नागरिकांनी खाण्या-पिण्याबाबत काळजी घ्यावी, अशा सूचना करण्यात आल्या आहेत. उन्हाच्या काहिलीपासून सुटका होण्यासाठी नागरिकांची पावले रसवंतिगृह, शीतपेयांकडे वळू लागली आहेत. शहाळे, लिंबू व इतर शीतपेयांची मागणीही प्रचंड वाढली आहे. माथाडी व इतर कष्टाची कामे करणाऱ्या नागरिकांना उकाड्याचा खूपच त्रास होऊ लागला आहे. उसाची मागणी सर्वाधिक वाढली आहे. तापमान ४०च्या पुढे गेल्यास लोकांनी काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. भरपूर पाणी पिणे, सावलीत राहणे, सुती आणि सैल कपडे घालणे, कडक उन्हात शारीरिक कष्टाची कामे न करणे, अशा सोप्या गोष्टींनी उष्माघाताचा धोका टाळता येतो. चक्कर यायला लागली असेल तर तुम्हाला उष्माघाताचा त्रास सुरू आहे, असे जाणून वेळेत वरील सोपे उपाय करणे पुढील मोठ्या धोक्यापासून वाचवू शकतात, असे तज्ज्ञांनी स्पष्ट केले.उष्माघातावर उपचारआपल्या आजूबाजूला कोणाला उष्माघाताचा झटका आला वा त्रास होऊ लागला, तर त्वरित दवाखान्यात न्यावे.सर्वप्रथम व्यक्तीला शक्य असल्यास वातानुकूलित जागेत अन्यथा सावलीत वा थंड ठिकाणी हलवावे आणि शरीरावरील जास्तीचे कपडे काढून टाकावेत. त्यामुळे शरीरातील उष्ण तापमान कमी होण्यास मदत होते.शरीराला ओल्या कपड्याने पुसून काढावे आणि व्यक्तीच्या आजूबाजूला हवा खेळती ठेवावी.बर्फ उपलब्ध असल्यास व्यक्तीच्या मानेवर, पाठीवर, काखेत आणि मांडीच्या सांध्यात बर्फाचा शेक द्यायला सुरु वात करावी. कारण वरील जागी रक्तप्रवाह संचय हा त्वचेच्या जवळच असतो व थंडतेमुळे शरीराचे उष्ण तापमान कमी व्हायला मदत होते.व्यक्तीवर पाण्याचा वर्षाव करावा किंवा त्या व्यक्तीला बाथटबमध्ये बुडवावे वा बर्फ टाकावा.व्यक्तीला मूर्च्छा आली असेल तर श्वसनक्रि येची तपासणी करावी.व्यक्ती शुद्धीवर आल्यावर त्याला पाणी पिण्यास द्यावे.ज्येष्ठांमध्ये मोठ्या प्रमाणात उष्माघाताची लागणउष्माघात हा प्रामुख्याने वयोवृद्ध, पाणी कमी पिणारे लोक, दीर्घ आजारी किंवा मद्यप्राशन करणाºया लोकांमध्ये आढळतो. अर्भके व चार वर्षांपर्यंतची लहान मुले, पासष्टीच्या पुढील वृद्ध मंडळी यांना उष्माघाताचा त्रास अधिक सहजपणे होऊ शकतो, असे डॉ. मेहुल कालवाडीया यांनी सांगितले. गेल्या दोन महिन्यांत आमच्याकडे येणाºया रु ग्णांमध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या प्रमाणात ३० ते ४० टक्क्यांनी वाढ झाली आहे.एप्रिल महिन्यात वाढलेल्या तापमानांमुळे ज्या ज्येष्ठ नागरिकांना हृदयरोग, फुप्फुसांचे आजार, मूत्रपिंडाचे आजार, लठ्ठपणा, उच्च रक्तदाब, मधुमेह आहे, त्यांना उष्माघाताची लागण मोठ्या प्रमाणावर होत असल्याचेही कालवाडीया यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Temperatureतापमान