Panvel: माजी उपमहापौर जगदीश गायकवाड यांच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीचा निषेध मोर्चा
By वैभव गायकर | Updated: November 30, 2022 14:12 IST2022-11-30T14:10:54+5:302022-11-30T14:12:12+5:30
Panvel News: वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या विरोधात वादग्रस्त ऑडिओ क्लिप पनवेलचे माजी उपमहापौर जगदीश यांच्या नावाने व्हायरल होत आहे.

Panvel: माजी उपमहापौर जगदीश गायकवाड यांच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीचा निषेध मोर्चा
- वैभव गायकर
पनवेल - वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या विरोधात वादग्रस्त ऑडिओ क्लिप पनवेलचे माजी उपमहापौर जगदीश यांच्या नावाने व्हायरल होत आहे.हे वक्तव्य जगदीश गायकवाड यांचेच असल्याचे सांगत वंचित बहुजन आघाडीच्या वतीने बुधवार दि.30 रोजी पनवेल शहरात निषेध मोर्चा काढण्यात आला होता.
या निषेध मोर्चात हजारोंच्या संख्येने आंबेडकरी अनुयायी सहभागी झाले होते.यावेळी जगदीश गायकवाड यांच्या विरोधात मोठ्या संख्येने घोषणाबाजी करण्यात आली.पनवेल शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून शहरातून पनवेल शहर पोलीस ठाण्यापर्यंत पायी मोर्चा काढत जगदीश गायकवाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.वंचितच्या नेत्या रेखा ठाकूर ,सिद्धार्थ मोकळे यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला होता.यावेळी पोलिसांचा फौजफाटा मोठ्या संख्येने उपस्थित होता.