पनवेल-रोहा दुपदरी मार्ग २८ मार्चला सुरू होणार
By Admin | Updated: March 22, 2017 01:38 IST2017-03-22T01:38:30+5:302017-03-22T01:38:30+5:30
पनवेल-रोहा रेल्वे मार्ग दुपदरीकरणाचे काम प्रगतिपथावर आहे. या रेल्वे मार्गापैकी नागोठणेपर्यंतचा दुपदरी मार्ग वाहतुकीसाठी

पनवेल-रोहा दुपदरी मार्ग २८ मार्चला सुरू होणार
रोहा : पनवेल-रोहा रेल्वे मार्ग दुपदरीकरणाचे काम प्रगतिपथावर आहे. या रेल्वे मार्गापैकी नागोठणेपर्यंतचा दुपदरी मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. काही प्रायोगिक सुरक्षा चाचण्या घेऊन २८ मार्चपासून पनवेल-रोहा दुपदरी रेल्वे मार्ग सुरू होणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे
१९ मार्चपासून नागोठणे ते रोहा या मार्गावरील सुरक्षा चाचणी घेण्याचे काम सुरू होणार असल्याने नागरिकांनी रेल्वे रुळांवर बसू नये किंवा रेल्वे मार्ग ओलांडताना खबरदारी घ्यावी अशा सूचना मध्य रेल्वे प्रशासनाने दिल्या आहेत. रोह्यापर्यंतचा दुपदरी रेल्वे मार्ग सुरू झाल्यानंतर कोकणात जाणाऱ्या व दक्षिणेकडून येणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्यांचा खोळंबा कमी होणार असल्याने प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. (वार्ताहर)