शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
"हिम्मत असेल, तर घोषणा करा..."! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींना दिली 3 आव्हानं; बघा VIDEO
3
"पोलिसांनी त्याची हत्या केली..."! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण
4
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
5
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
6
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
7
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
8
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
9
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
10
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
11
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
12
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
13
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
14
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
15
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
16
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
17
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
18
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
19
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
20
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम

घरफोडी करणा-या सराईत चोराला अटक, २१ लाखांचे सोने हस्तगत : पनवेल पोलिसांची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2017 2:56 AM

काही महिन्यांपूर्वी पनवेल शहर आणि परिसरात चोरीच्या घटना घडल्या होत्या. या घरफोड्या करणा-या सराईत चोराला शहर पोलिसांनी अटक केली असून, त्याच्याकडून सुमारे २१ लाख रु पये किमतीचे ७० तोळे सोने हस्तगत करण्यात आले आहे.

पनवेल : काही महिन्यांपूर्वी पनवेल शहर आणि परिसरात चोरीच्या घटना घडल्या होत्या. या घरफोड्या करणा-या सराईत चोराला शहर पोलिसांनी अटक केली असून, त्याच्याकडून सुमारे २१ लाख रु पये किमतीचे ७० तोळे सोने हस्तगत करण्यात आले आहे.   पनवेल चिंचपाडा येथील संतोष परदेशी यांच्या घराचे खिडकीचे ग्रील तोडून चोरट्याने १ लाख ३५ हजार रु पये किमतीचे दागिने व रोख रकमेची चोरी केली होती. या चोºयांमध्ये हातखंडा असलेल्या सरमन उर्फ श्रावण रामदेव राजभर याला पनवेल शहर पोलिसांनी तांत्रिक पद्धतीने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून लालगंज, अजमगढ (उत्तरप्रदेश) येथून अटक केली आहे. त्याच्याकडून आठ घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या आरोपीवर जवळपास २०हून अधिक घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. २०१३मध्ये घरफोडीच्या गुन्ह्यात त्याला क्र ाइम ब्रँचकडून अटक झाली होती. एप्रिल महिन्यात जेलमधून बाहेर आल्यानंतर तो गावी गेला व गावावरून परत आल्यानंतर त्याने पुन्हा घरफोडी करण्यास सुरु वात केली. दरम्यानच्या काळात श्रावण राजभर हा आरोपी चेंबूर, टिळकनगर येथे राहत असे. चोरी करताना तो कोणतेही वाहन वापरत नसे. पायी एखाद्या गावात जायचा व तेथील खिडकी लोखंडी सळीने उघडून घरफोडी करण्यात या चोरट्याचा हातखंडा होता. पनवेल परिसरातील पारगाव, खारघर, कामोठे, न्हावाशेवा आदी भागांत या चोरट्याने चोºया केल्या असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या चोराकडून पोलिसांनी आतापर्यंत २१ लाख किमतीचे ७०० ग्रॅम सोने हस्तगत के ले आहे.

टॅग्स :Crimeगुन्हाThiefचोरArrestअटकNavi Mumbaiनवी मुंबई