पनवेल महानगरपालिका : ९४३ कोटींच्या अर्थसंकल्पाला महासभेची मंजुरी, २९ गावांच्या पायाभूत विकासावरही भर देणार 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2020 11:13 AM2020-10-24T11:13:28+5:302020-10-24T11:15:33+5:30

पाणीपुरवठा योजना, रस्ते, सुसज्य अग्निशमन सेवा, पनवेल महानगरपालिकेमध्ये समाविष्ट झालेला २९ गावांचा पायाभूत विकास, तसेच विकासासाठी आवश्यक असणाऱ्या वेगवेगळ्या नवीन प्रकल्पांचा समावेश या अंदाजपत्रकामध्ये करण्याचा प्रयत्न केला आहे.

Panvel Municipal Corporation: General Assembly approves budget of Rs 943 crore, will also focus on infrastructure development of 29 villages | पनवेल महानगरपालिका : ९४३ कोटींच्या अर्थसंकल्पाला महासभेची मंजुरी, २९ गावांच्या पायाभूत विकासावरही भर देणार 

पनवेल महानगरपालिका : ९४३ कोटींच्या अर्थसंकल्पाला महासभेची मंजुरी, २९ गावांच्या पायाभूत विकासावरही भर देणार 

googlenewsNext


वैभव गायकर

पनवेल : पनवेल महानगरपालिकेच्या सन २०१९-२०चा सुधारित व २०२०-२१चा मूळ अशा ९४३ कोटींच्या अर्थसंकल्पाला गुरुवारी पार पडलेल्या विशेष महासभेत मंजुरी मिळाली. स्थायी समिती सभापती प्रवीण पाटील यांनी हा अर्थसंकल्प महासभेत मांडला.

पाणीपुरवठा योजना, रस्ते, सुसज्य अग्निशमन सेवा, पनवेल महानगरपालिकेमध्ये समाविष्ट झालेला २९ गावांचा पायाभूत विकास, तसेच विकासासाठी आवश्यक असणाऱ्या वेगवेगळ्या नवीन प्रकल्पांचा समावेश या अंदाजपत्रकामध्ये करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचबरोबर दिव्यांग कल्याण, महिला व बालविकास, मागावर्गीय घटक, अल्पसंख्यांक घटक आणि क्रीडा व सांस्कृतिकविषयक बाबींसाठी शासन धोरणानुसार स्थानिक स्वराज्य संस्थेने करावयाची अपेक्षित तरतूद सदर अर्थसंकल्पात करण्यात आलेली आहे. महानगरपालिकेच्या कार्यालयासाठी आवश्यक असणाऱ्या जागेची कमतरता भरून काढण्यासाठी सिडकोकडून पनवेल पालिकेच्या नव्या कार्यालयासाठी भूखंड उपलब्ध करून घेऊन, त्या ठिकाणी कार्यालये व प्रभाग कार्यालये बांधण्यासाठी या अर्थसंकल्पामध्ये तरतूद केलेली आहे, तसेच सिडको प्राधिकरणाकडून पनवेल महानगरपालिकेस हस्तांतरित होणाऱ्या भूखंडासाठी पुरेशी तरतूद करण्यात आलेली आहे.

सन २०१९-२०२०च्या सुधारित अंदाजपत्रकात चालू वित्तीय वर्षातील प्रथम आठ महिन्यांतील (नोव्हेंबर, २०१९पर्यंत) प्रत्यक्ष जमा-खर्च व पुढील ४ महिन्यांत होणारा अपेक्षित जमा-खर्च विचारात घेण्यात आलेले आहेत. पनवेल महापालिकेस प्राप्त होणाऱ्या उत्पन्नाच्या प्रमाणात होणारा खर्च मर्यादित ठेवणे अपेक्षित असल्यामुळे, त्या अनुषंगाने सुधारित खर्चाची मर्यादा प्रस्तावित करण्यात येत आहे.

सन २०२०-२१च्या मूळ अर्थसंकल्पात सुरुवातीच्या शिलकेसह ९४५  कोटी उत्पन्न अपेक्षित धरण्यात आले असून, रुपये ९४३.४२ कोटी खर्च अपेक्षित आहे.

अर्थसंकल्पातील ठळक बाबी -
मालमत्ता व इतर कर - २०५ कोटी, वस्तू व सेवा कर अनुदान - १३० कोटी, १% मुद्रांक शुल्क अनुदान - ६९ कोटी, अमृत/नगरोत्थान योजनेंतर्गत अनुदान - ९७ कोटी, (पाणीपुरवठा व मलनि:सारण), विकास शुल्क व फायर प्रीमिअम - ४० कोटी, सहायक अनुदान - ३० कोटी, ठेवींवरील व्याज - १५ कोटी, स्वच्छ भारत अभियान अनुदान - १० कोटी, कोविड -१९ अनुदान - १५ कोटी.

पनवेलचा सर्वांगीण विकास समोर ठेऊन अर्थसंकल्पात विविध तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. सदर अंदाजपत्रक सादर करताना, अनेक सकारात्मक योजना, तरतुदी यावर स्थायी समिती सदस्यांची सखोल चर्चा झाली. पनवेल महानगरपालिकेच्या विकासाकरिता आमदार प्रशांत ठाकूर यांचे मार्गदर्शन असणार आहे.  त्याचबरोबर, आपल्या सर्वांचे सहकार्य, तसेच मार्गदर्शन मिळेल, अशी आशा आहे.
- प्रवीण पाटील, स्थायी समिती सभापती, पनवेल महानगरपालिका

अर्थसंकल्पातील महत्त्वाच्या बाबी  
- छत्रपती संभाजी महाराज मैदान 
    विकसित करणे
- पावसाळी जलनि:सारणाची 
    २२ कोटींची कामे
- स्मार्ट व्हिलेज योजना नवीन ७ गावे
- स्मशानभूमींचा विकास
- बगीच्यांचा विकास
- रस्त्यांचे काँक्रिटीकरण नवीन ७ किमी
- २,३०० घरांची पंतप्रधान आवास योजना
- स्वराज्य झ्र नवीन मुख्यालय इमारत             
    बांधकाम
- प्रभाग कार्यालये बांधकाम झ्र खारघर, 
   कळंबोली, कामोठे
- भाजीमार्केट अंतिम भूखंड क्रमांक 
   १९३चे बांधकाम
- मालमत्ता कराचे संगणकीकरण
- विकास योजना पूर्णत्वास नेणे
- डेली बाजाराचे बांधकाम
- अमृत पाणीपुरवठा योजना
- कोपरा व जुई तलावाचे सुशोभीकरण
 

Web Title: Panvel Municipal Corporation: General Assembly approves budget of Rs 943 crore, will also focus on infrastructure development of 29 villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.