शहरं
Join us  
Trending Stories
1
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
2
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
3
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
4
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
5
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
7
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
8
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
9
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
10
Shark Tank India नं 'या' Startup ला पाठवली कायदेशीर नोटीस, वाचा नक्की कशावरुन झाला वाद?
11
एसटी बसेस निवडणूक कामात व्यस्त, प्रवासी मात्र त्रस्त
12
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
13
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
14
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट
15
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
16
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
17
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
18
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
19
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
20
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज

पहाटेपर्यंत बारमध्ये रंगताहेत पार्ट्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2018 2:53 AM

पहाटेपर्यंत चालणाऱ्या बारमुळे शहरातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. मद्यपींच्या सोयीसाठी काही बार, हॉटेल पहाटेपर्यंत सुरू ठेवले जात असल्याचे उघडपणे दिसत आहे.

सूर्यकांत वाघमारे नवी मुंबई : पहाटेपर्यंत चालणाऱ्या बारमुळे शहरातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. मद्यपींच्या सोयीसाठी काही बार, हॉटेल पहाटेपर्यंत सुरू ठेवले जात असल्याचे उघडपणे दिसत आहे. अशा व्यावसायिकांवर ठोस कारवाईऐवजी महिन्याला पाच हजारांचा दंड आकारून पोलिसांकडून कारवाईचा दिखावा होत असल्याचे दिसून येत आहे.शहराच्या संस्कृतीला गालबोट लागेल असे प्रकार काही व्यावसायिकांकडून होत आहेत. त्यामध्ये बहुतांश मद्यविक्रेत्यांसह काही बार व हॉटेल व्यावसायिकांचा समावेश आहे. व्यावसायिक उद्देश साध्य करण्यासाठी त्यांच्याकडून सर्व कायद्यांची पायमल्ली होताना दिसत आहे. यामुळे शहरातल्या अनेक विभागांमध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. काही हॉटेल व्यावसायिकांकडून उघड्यावरच टेबल मांडून बार चालवले जात आहेत. त्यामुळे त्याठिकाणच्या रस्त्याने ये-जा करणाºया महिला, मुलींना लाजेखातर आपला मार्ग बदलावा लागत आहे. कोपरखैरणेतील क्लासिक व समुद्र हे दोन्ही बार पहाटे सहा वाजेपर्यंत चालवले जात असल्याचे दिसून येत आहे.दोन्ही बार रहदारीच्या मुख्य रस्त्यावर असल्याने अनेकांनी त्याची पोलिसांकडे तक्रार देखील केलेली आहे. त्यापैकी समुद्र बार ज्ञानविकास शाळेपासून काही अंतरावरच असल्याने शाळेत जाणाºया विद्यार्थ्यांना सकाळी सकाळी तळीरामांचे दर्शन घडत आहे. या प्रकाराबाबत पालकांनीही संताप व्यक्त केला आहे.प्रवेशद्वाराचे अर्धवट शटर बंद ठेवून हे बार पहाटेपर्यंत चालवले जात आहेत. अशावेळी एखाद्याची तक्रार आल्यास सदर हॉटेल अथवा बारवर पोलिसांकडून दंड स्वरूपात पाच हजार रुपयांची पावती फाडली जाते. त्यानंतर मात्र पुन्हा पुढची तक्रार येईपर्यंत त्याठिकाणी कायद्याची पायमल्ली सुरूच असते. यामुळे प्रत्येक महिन्याला अशा बारवर एकतरी दंडाची कारवाई करून बाजू सावरण्याचा प्रकारच पोलिसांकडून सुरू असल्याचाही नागरिकांचा आरोप आहे.पहाटेपर्यंत चालणाºया बार व्यावसायिकांकडून पोलिसांना प्रतिमहिना लाखमोलाचे सहकार्य होत असल्याची देखील चर्चा आहे. यामुळे देखील त्यांना कायद्याची पायमल्ली करण्यात पोलिसांकडून सूट मिळत असल्याची शक्यता सर्वसामान्यांकडून वर्तवली जात आहे. तर मद्यविक्री केंद्राबाहेर अथवा पाडलेल्या अनधिकृत बांधकामाच्या ठिकाणी उघड्यावर मद्यपानाला थेट उत्पादन शुल्क विभागाकडूनच छुपे पाठबळ मिळत असल्याने त्याठिकाणीही पोलिसांकडून डोळेझाक होताना दिसत आहे.या प्रकारामुळे रात्रीच्या वेळी मद्यपान करून परिसरात भटकणाºयांकडून गंभीर गुन्हेगारी कृत्य घडल्यानंतर झोपेचे सोंग घेणारे प्रशासन जागे होणार का? असाही प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. शिवाय, पोलिसांच्या कामगिरीवर नाराजी व्यक्त होत आहे.>उशिरापर्यंत बार चालवला जात असतानाही पकडले जाऊ नये याकरिता बिलाच्या मशिनमध्ये फेरफार केला जात आहे. काही बारमध्ये मध्यरात्री दीडनंतर बिलाची प्रिंट दिली जात नाही, तर काहींनी प्रिंट मशिनमधून वेळ हटवली आहे. काहींनी रात्री दीडनंतर प्रिंट होणाºया बिलावर वेळ छापली जाणार नाही असे फेरफार करून घेतल्याचेही समोर आले आहे.>पहाटेपर्यंत सुरू राहणाºया बारमुळे त्याच मार्गाने सकाळच्या वेळी शाळेत जाणाºया विद्यार्थ्यांवर वाईट संस्कार घडण्याची शक्यता आहे. तिथले गर्दुल्ले रात्री उशिरापर्यंत रस्त्यावर भटकत असल्याने गुन्हेगारी घटना घडण्याचीही शक्यता असते. अशा बार व्यावसायिकांचे परवाने रद्द करण्याची गरज आहे.- मनोज म्हात्रे, कोपरखैरणे रहिवासी